आता या देशात व्हीसाशिवाय भारतीयांना प्रवेश, पाहा केव्हापासून व्हीसा फ्री एण्ट्री ?

आपल्या परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट सोबत त्या देशाचा व्हीसा देखील गरजेचा असतो. जगातील काही देशात व्हीसाशिवाय भारतीयांना प्रवेश मिळतो. परंतू या देशांची संख्या खूप कमी आहे. त्यात आता पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाने देखील भारतीयांना व्हीसा फ्री प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा कोणता आहे हा देश ?

आता या देशात व्हीसाशिवाय भारतीयांना प्रवेश, पाहा केव्हापासून व्हीसा फ्री एण्ट्री ?
MalaysiaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 5:02 PM

मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : भारतीयांना अनेक देशात व्हीसा शिवाय प्रवेश मिळत नाही. त्यामुळे व्हीसा कार्यालयात अनेक वेळा खेटे मारावे लागत असतात. परंतू आता पुढील महिन्याच्या 1 डिसेंबर या तारखेपासून व्हीसा शिवाय मलेशियाची सैर करता येणार आहे. भारतासह चीनच्या नागरिकांना देखील व्हीसा शिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मलेशियाला जाऊ इच्छीणाऱ्यांना व्हीसा कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज रहाणार नाही. त्यांना मलेशियात व्हीसा फ्री प्रवेशाचा आनंद घेता येणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी रविवारी रात्री उशीरा ही घोषणा केली आहे.

आपल्या अनेक देशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हीसा देखील लागतो. या व्हीसाचे नियम कडक असतात. व्हीसा मिळायला त्यामुळे वेळ लागत असतो. परंतू मलेशियात जाण्यासाठी व्हीसाची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी आपल्या पिपल्स जस्टीस पार्टी कॉंग्रेसच्या भाषणात ही घोषणा केली आहे. अनवर इब्राहीम यांनी म्हटले आहे की या व्हीसा फ्री प्रवासाची सवलत आता चीनी आणि भारतीय नागरिकांना मिळणार आहे. 30 दिवसांपर्यंत मलेशियात व्हीसाशिवाय रहाता येणार आहे. परंतू व्हीसा फ्री सेवेचा लाभ केव्हापर्यंत मिळणार हे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी सांगितलेले नाही.

मलेशियाने का घेतला हा निर्णय ?

मलेशियाने हा निर्णय तेथील पर्यटनवाढीसाठी घेतला आहे. पर्यटनवाढी बरोबर अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चीनी आणि भारतीय नागरीकांना मलेशियाला जाण्यासाठी व्हीसासाठी अर्ज करावा लागतो. याआधी श्रीलंका आणि थायलंड या देशांनी देखील भारतीयांना व्हीसा फ्री प्रवेशाची घोषणा केली आहे.

Non Stop LIVE Update
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.