Good News |  2022मध्ये पर्यटकांना करता येणार अंतराळाची सफर! एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती…

आवकाशात जाऊन तिथली विहंगम आणि अद्भुत दृश्ये पाहणे कोणाला आवडणार नाहीत? प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी अंतराळात जाण्याचे स्वप्न बाळगतो.

Good News |  2022मध्ये पर्यटकांना करता येणार अंतराळाची सफर! एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती...
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 10:59 AM

मुंबई : आवकाशात जाऊन तिथली विहंगम आणि अद्भुत दृश्ये पाहणे कोणाला आवडणार नाहीत? प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी अंतराळात जाण्याचे स्वप्न बाळगतो. असे स्वप्न घेऊन बाळगलेल्यांपैकी आपणही एक असाल, तर आपल्यासाठी आणि अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. वृत्तानुसार, जर कोरोना परिस्थिती निवळली आणि सर्व काही ठीक झाले, तर पुढच्या वर्षी अर्थात 2022 पासून रिचर्ड ब्रॅन्सनचे ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक स्पेसक्राफ्ट’ पहिल्यांदा सामान्य पर्यटकांना 90 मिनिटांसाठी अंतराळाच्या सफरीवर नेईल (Space travel in 2022 regular travelers  can travel in space know the details).

स्पेसक्रॉफ्ट कंपनीने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या व्हर्च्युअल टूरच्या व्हिडीओद्वारे याची पुष्टी केली गेली आहे. अंतराळ प्रवासासाठी खास व्हीएसएस युनिटीची रचना करण्यात आली होती.

या स्पेस शिपमध्ये खास काय?

या स्पेस शीपमध्ये एकाच वेळी तब्बल 6 प्रवासी अंतराळ प्रवास करू शकतात. यासह, प्रवासाच्या वेळी दोन क्रू मेंबर्सही या स्पेस शीपमध्ये सोबत असतील. प्रवाशांची लांबी, उंची आणि वजनानुसार हे स्पेस शीप डिझाईन केले गेले आहे. या वाहनात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा दिली जाईल. या तंत्रांच्या मदतीने प्रवासी पायलटच्या थेट संपर्कात राहू शकतात. या वाहनाला गोलाकार खिडकी असेल, ज्याद्वारे प्रवासी अंतराळातील जागा पाहण्यास सक्षम असतील. हे वाहन पृथ्वीपासून 97 कि.मी. उंचीवर जाईल (Space travel in 2022 regular travelers  can travel in space know the details).

मोबाईल नेण्यास मनाई

या अंतराळ सहलीवर जाताना प्रवाशांना सोबत मोबाईल घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे प्रवाशांना याचा त्रास होऊ शकतो. या कारणास्तव मोबाईल सोबत नेण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे मुख्याधिकारी म्हणाले की, अशा अदभूत सहलीवर जाताना प्रत्येकालाच तिथल्या आठवणी जपून ठेवाव्यात असे वाटेल. म्हणूनच, मोबाईलला परवानगी नसली तरी, सेल्फीसाठी या स्पेस शीपमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोबाईल सोबत नसण्याचे दुःख होणार नाही. याखेरीज स्पेस शीपमधील आणखी दोन कॅमेरे रेकॉर्डिंग मोडवर सुरु असतील.

म्हणजेच, आपण स्पेस सूट उघडून परवानगी असलेल्या मोकळ्या जागेवर फेरफटका मारू शकता. 60 प्रवाशांनी या अंतराळ पर्यटनासाठी आधीच करार केला आहे. त्याचबरोबर, या तिकिटाची किंमत 2 लाख 50 हजार डॉलर्स इतकी आहे. अर्थात, या 90 मिनिटांच्या अनोख्या सहलीसाठी तब्बल 1 कोटी 82 लाख रुपये (1,82,83,875/-)  ,ओजावे लागणार आहेत. हे अवकाश यान न्यू मेक्सिको येथून उड्डाण करेल. यापूर्वी 2020 मध्ये ही स्पेस शीप अवकाशात जाणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे या प्रवासाची तारीख बदलण्यात आली आहे.

(Space travel in 2022 regular travelers  can travel in space know the details)

हेही वाचा :

हिमालयातील सुंदर घाटीची सैर करा अवघ्या 11 हजार रुपयांत!

स्वत:च्या वाहनातून जंगल सफरीचा आनंद घ्यायचाय, चला चंद्रपूरला, वनविभागाकडून कमी खर्चात पर्यटनाची संधी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.