AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमालयातील सुंदर घाटीची सैर करा अवघ्या 11 हजार रुपयांत!

तुम्ही फक्त 11 हजार रुपयात हिमालयातील सुंदर घाटीची सैर करु शकणार आहात.

हिमालयातील सुंदर घाटीची सैर करा अवघ्या 11 हजार रुपयांत!
Updated on: Mar 01, 2021 | 3:13 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर IRCTCचं एक स्पेशल पॅकेट तुमची ट्रिप सोपी करेल. या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त 11 हजार रुपयात हिमालयातील सुंदर घाटीची सैर करु शकणार आहात. IRCTCचं हे पॅकेजमध्ये तुम्हाला सिक्किममधील बर्फाळ डोंगर, विदेशी वनस्पती आणि जीवजंतूंच्या माहितीसोबत जंगल, धबधबे, गुहा, औषधीय गरम धबधबे, नद्या फिरण्याचा आनंद लुटता येईल. पूर्व हिमालय परिसरात असलेल्या सिक्किम भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे.(IRCTC’s special package for trip to Sikkim)

पॅकेजमध्ये 4 दिवस IRCTCच्या या पॅकेजचं नाव स्प्लेंडर हिमालय आहे. यात गंगटोकचीही सफर करता येणार आहे. याची फ्रिक्वेन्सी प्रत्येक शनिवारी असणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर मिळेल, त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही. हे पॅकेज 3 दिवस आणि 4 रात्रींसाठी असणार आहे. यात डबल ऑक्यूपेन्सी 14 हजार 400 रुपये, ट्रिपल ऑक्यूपेन्सी 11 हजार 95 रुपये आणि चाईल्ड विथ बेड (5 ते 11 वर्षे) 4 हजार 475 रुपये असेल.

जगातील तिसरं सर्वात उंच शिखर फिरण्याची संधी

या पॅकेजमध्ये तुम्हाला जगातील तिसरं सर्वाच उंच शिखर असलेल्या कंचनगंगा फिरण्याची संधी मिळेल. हे शिखर सिक्किमच्या उत्तर-पश्चिम भागात नेपाळच्या सीमेवर स्थित आहे. हे शिखर राज्याच्या अन्य भागातूनही पाहिलं जाऊ शकतं. स्वच्छ, नैसर्गिक सुंदरता आणि राजकीय स्थिरता अशा अनेक वैशिष्ट्यांनी सिक्किम भारतातील पर्यटनाचं प्रमुख केंद्र आहे.

गंगटोकपासून सुरुवात

पॅकेजच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सिक्किमची राजधानी गंगटोकला घेऊन जाण्यात येईल. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर तिथे आराम होईल. एक रात्र तिथेच मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्सोंगमो लेक आणि बाबा हरभजन मेमोरियलला घेऊन जाण्यात येईल. त्सोंगमो लेक थंडीच्या काळात पूर्णपणे गोठलेला असतो. इथल्या स्थानिकांकडून तुम्हाला मोठा सन्मान दिला जातो.

तिसऱ्या दिवशी तुम्हाला ब्रेकफास्टनंतर गणेश टोक, हनुमान टोक, तशी व्ह्यू पॉईंट, एंचेय मोनेस्ट्री, फ्लॉवर शो पाहण्यासाठी घेऊन जाण्यात येईल. पॅकेटज्या शेवटच्या दिवशी तुमचं हॉटेलमधून चेक आऊट केलं जाईल.

पॅकेजची कॅन्सलेशन पॉलिसी

>> 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीमध्ये प्रति व्यक्ती 250 रुपये कपात होईल

>> 8 ते 14 दिवसांमध्ये 25 टक्के कपात केली जाईल

>> 4 ते 7 दिवसांत 50 टक्के कपात केली जाईल

>> 4 पेक्षा कमी दिवस असताना कोणतीही कपात होणार नाही

इतर बातम्या :

‘या’ दुकानात एक कप चहाची किंमत 1000 रुपये, वाचा आश्चर्यचकित करणारी कहानी

आनंदाची बातमी: ऐन लग्नसराईच्या मोसमात जळगावात सोने-चांदी स्वस्त

IRCTC’s special package for trip to Sikkim

18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट.
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.