World Travel and Tourism Festival 2025 : ये मोह मोह के धागे… पॅपनचा लाइव्ह शो, तिकीट आजच बुक करा!

टीव्ही9 आणि रेड हॅट कम्युनिकेशन्सने आयोजित केलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम फेस्टिव्हल 2025 मध्ये प्रसिद्ध गायक पॅपन लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहेत. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हा तीन दिवसीय महोत्सव होणार आहे. या महोत्सवात संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

World Travel and Tourism Festival 2025 : ये मोह मोह के धागे... पॅपनचा लाइव्ह शो, तिकीट आजच बुक करा!
PaponImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 7:44 PM

टीव्ही9 नेटवर्क आणि रेड हॅट कम्युनिकेशन्सने वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम फेस्टिव्हल आयोजित केला आहे. भारतीय पर्यटकांना नवीन अनुभव देणे आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देणे हे या फेस्टिव्हलचे मुख्य उद्दिष्ट आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम फेस्टिव्हल 2025 चे आयोजन करण्यासाठी नवी दिल्ली पूर्णपणे तयार झाली आहे. दिल्लीच्याच मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये तीन दिवस हा फेस्टिव्हल रंगणार आहे. या फेस्टिव्हलमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत.

फेब्रुवारी 14 ते 16, 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटमुळे भारतातील आणि जगभरातील ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या भविष्यात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रसिद्ध गायक पॅपन आपला दमदार परफॉर्मन्स देऊन या फेस्टिव्हलमध्ये चार चाँद लावणार आहेत. येत्या 14 फेब्रुवारी रोजी संगिताचा हा अद्भूत आनंद घेता येणार आहे.

पॅपन यांच्या विषयी

पॅपन हे पार्श्वगायक आणि संगीतकार आहेत. ते मूळचे आसामचे आहेत. त्यांचं मूळ नाव अंगराग महंता आहे. पण पॅपन या नावानेच ते संगीतसृष्टीत ओळखले जातात. मोहक आवाज आणि लोकसंगीत तसेच समकालीन संगिताचं मिश्रण करून परफॉर्मन्स देणं हे त्यांचं वैशिष्ट्ये आहे. पॅपन हे गेल्या अनेक वर्षापासून संगीत जगतात आपलं योगदान देत आहेत. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

पॅपन कन्सर्ट: तारीख, वेळ

पॅपनचा लाईव्ह परफॉर्मन्स 14 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू होईल. यावेळी संगीतबरोबरच सांस्कृतिक प्रदर्शनेही पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर अस्सल भारतीय स्वादिष्ट अन्न पदार्थांचाही अस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीची संध्याकाळ संस्मरणीय करण्यासाठी सज्ज राहा. यंदाचा व्हॅलेंटाइन डे अत्यंत वेगळा आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा हाच योग्य मार्ग आहे. आपण आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक डेट प्लॅन करत असाल किंवा मित्र-परिवारासोबत रात्रीचा प्लॅन करत असाल, तर हा इव्हेंट एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

तिकीट कसे बुक करावे?

तुमचे तिकीट बुक करणे खूप सोपे आहे. एक मोहक संगीत संध्याकाळ अनुभवण्यासाठी, तुम्ही तिकीट सहजपणे बुक करू शकता.

सर्वप्रथम BookMyShow.com ला भेट द्या.

तुमची तिकीटे निवडा. तिकीट दर रु. 499 पासून सुरू होतात.

नंतर तुमचे ई-तिकीट डाउनलोड करा.

पॅपनचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहण्यासाठी हे एक उत्तम संधी आहे. यावेळी पॅपन पारंपारिक भारतीय संगीत सादर करणार आहेत. “मो मोह के धागे”, “जियेँ क्यूँ” अशा आयकोनिक ट्रॅकसह त्यांनी लाखोंची हृदये जिंकली आहेत. अप्रतिम संगीत, उत्साही परफॉर्मन्सेस आणि इलेक्ट्रिक लाईट्ससह भरलेले वातावरण तुम्हाला एक उत्कृष्ट संगीत अनुभव देईल.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....