ज्या देशात जाईल तिथं एक बॉयफ्रेंड; काय आहे या हायली एज्युकेटेड तरुणीचं ‘मिशन बॉयफ्रेंड’?

अमेरिकेतील एक तरुणी जगाच्या सफरीवर निघाली आहे. प्रत्येक देशात तिचा एक बॉयफ्रेंड आहे. तिने मिशन बॉयफ्रेंडच हाती घेतलं आहे. या मिशनमागे तिची खास भूमिका आहे. ती काय आहे?

ज्या देशात जाईल तिथं एक बॉयफ्रेंड; काय आहे या हायली एज्युकेटेड तरुणीचं 'मिशन बॉयफ्रेंड'?
Starly SantosImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 1:32 PM

न्यूयॉर्क : आपल्यावर मनापासून प्रेम करणारा पार्टनर मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. ती असो की तो. दोघांचीही तीच इच्छा असते. पण जीवाला जीव देणारा पार्टनर मिळेलच असं नाही. काही लोकांना मिळतो. पण काहींना तर कितीही शोधून पाहिलं तरी मनासारखा पार्टनर मिळत नाही. कितीही हातपाय मारा, काही करा, अशा लोकांना त्यांच्या मनातील पार्टनर मिळत नाही. आता या तरुणीचीच गोष्ट घ्या. तिला अजूनही तिच्या मनासारखा पार्टनर मिळालेला नाही. अनेक देश फिरली. तिच्या डोक्यात अनेक आयडियांनी थैमान घातलं. त्याची माहितीही तिने खुलेमनाने दिली. पण तिला मनासारखा पार्टनर मिळाला नाही.

स्टार्ली सँटोस (Starly Santos) असं या तरुणीचं नाव आहे. स्टार्ली 27 वर्षाची आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून तिने पदवी घेतली आहे. ती क्रिप्टोकरन्सी ट्रेडर आहे. पण सध्या ती आपला कामधंदा सोडून विविध देशाच्या मिशनवर निघाली आहे. जगातील वेगवेगळ्या देशाचा प्रवास करणं हे तिचं मिशन आहे. त्या त्या देशाची परंपरा, रितीरिवाज, संस्कृती समजून घेणं हे तिचं मिशन आहे. तसेच परफेक्य पार्टनरच्या शोधण्याचं मिशनही तिने हाती घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

जगभर बॉयफ्रेंड

स्टार्लीचे अनेक देशात बॉयफ्रेंड आहेत. त्यांच्यासोबत ती फिरत असते आणि त्यांना डेटिंगही करत असते. प्रत्येक देशातील लोकांना समजता यावं, त्यांची संस्कृती समजावी यासाठी ती असं करत असते. विशेष म्हणजे ती जेव्हाही एखाद्या देशातील मुलासोबत डेटवर जाते तेव्हा ती त्याच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते. ती भारतातही येऊन गेलीय. मुंबईपासून ते ताजमहलपर्यंतचा तिने दौरा केला आहे. याशिवाय ती कोलंबियालाही गेली होती. कोलंबियात तिने एका तरुणासोबत कॉफी डेट केली होती. थायलंडमध्ये तर तिने विंचूही खाऊन पाहिला आहे.

आत्महत्येचा विचार आला

अल्झमायर्समुळे तिच्या आईचं निधन झालं होतं. त्यावेळी स्टार्ली प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर ती त्यातून सावरली. त्याचवेळी तिने एकटीनेच संपूर्ण जग फिरण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी तिच्या डोक्यात एक भन्नाट विचार आला. ज्या देशात जायचं तिथल्या तरुणासोबत डेटवर जायचं. म्हणजे तिथली संस्कृती समजेल. तिथलं जीवन समजेल आणि तिल्या परंपरांची माहितीही मिळेल. गंमत म्हणजे ती अजूनही तरुणांसोबत डेटच करत आहे. तिला अजूनही सच्चा पार्टनर मिळालेला नाहीये.

Non Stop LIVE Update
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.