AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair care: नारळाचे तेल आणि लिंबाचा रस एकत्र लावा; केस लांबसडक आणि एकदम घनदाट होतील

लांबसडक, दाट केस सर्वांनाच हवे असतात. पण वाढते प्रदूषण, धावपळीची जीवनशैली यामुळे केस तुटतात, गळण्याची समस्या वाढते. घरातीलच काही गोष्टींचा वापर केल्यास केसांच्या समस्या नक्कीच दूर होतील. 

Hair care: नारळाचे तेल आणि लिंबाचा रस एकत्र लावा; केस लांबसडक आणि एकदम घनदाट होतील
| Updated on: Jul 09, 2022 | 7:24 PM
Share

घनदाट, मजबूत केस सर्वांना हवे असतात. मात्र सध्याची धावपळीची जीवनशैली, वाढते प्रदूषण (Pollution), खाण्याच्या अनियमित वेळा या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर तसेच केसांच्या आरोग्यावरही होत असतो. केसांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केस गळणे, तुटणे, कोरडे होणे, पांढरे होणे अशा अनेक समस्यांचा (Hair problems) सामना करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी पार्लरमध्ये जाणे, स्पा किंवा इतर महागडे उपचार करणे दरवेळेस शक्य नसते. सगळ्यांकडे तितका वेळही नसतो. मात्र घरच्याघरी काही साधेसोपे उपाय करुन (Home remedies)केसांची समस्या नक्कीच सोडवता येते. रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश करून केसगळती व इतर समस्या कमी होऊ शकतात.

केसांना मालिश करण्यासाठी नारळाचे तेल आपण नेहमीच वापरतो. मात्र त्यासोबतच लिंबाच्या रसाचा उपयोग केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलामुळे केसांचे पोषण होऊन त्यांची चांगली वाढ तर होतेच, पण केस तुटणे, अकाली पांढरे होणे या समस्याही दूर होतात. तसेच लिंबाच्या रसाचेही अनेक फायदे होतात. त्यामुळे नारळाचे तेल व लिंबाचा रस, या दोन्ही गोष्टी एकत्र वापरल्याने केसांसाठी उपयुक्त ठरते.

टाळूला सुटणारी खाज कमी होते

एका वाटीत 3-4 चमचे नारळाचे चमचे तेल घ्या. त्यामध्ये लिंबाचा थोडा रस मिसळा. हे मिश्रण एकत्र करून स्नान करण्यापूर्वी केसांना, विशेषत: टाळूला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हे नियमितपणे केल्याने केसांना पोषण तर मिळतेच पण टाळूची कोरडी त्वचा मऊ होऊन सुटणारी खाजही कमी होते. परिणामी केसांतील कोंडा कमी होतो.

केस छान वाढतात

लिंबाचा रस आणि नारळाचे तेल , या दोन्हींमध्ये भरपूर पोषक गुणधर्म असतात. आपली आजी, आई लहानपणी नेहमीच आपल्याला तेलाने केसांना छान मालिश करून द्यायची. त्यमुळे केसांचे छान पोषण होऊन त्यांची वाढही चांगली होते. नारळाचे तेल आणि लिंबाच्या रसामुळे सी व डी व्हिटॅमिनची कमतरता दूर होते व केस छान वाढतात.

केस चमकदार होतात

वाढते प्रदूषण, हवेचा खालावलेला स्तर या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्याप्रमाणेच केसांवरही परिणाम होत असतो. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. लिंबाचा रस आणि नारळाचे तेल, या दोहोंच्या मिश्रणाने केसांना छान मसाज केल्यास त्यांचे पोषण होते. केसांचा पोत सुधारतो आणि ते छान चमकदारही होतात. आठवडयातून दोन वेळा तरी हे मिश्रण केसांना नक्की लावा. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल

केस पांढरे होणार नाहीत

केस पांढरे होण्याचे मुख्य कारण, म्हणजे त्यांना नीट पोषण न मिळणे. लहान वयातच अनेकांचे केस पांढरे होतात. स्ट्रेस, पुरेशी झोप न होणं किंवा हार्मोनल असंतुलन, हे केस पांढरे होण्यामागचं कारण असू शकत. नंतर ते पांढरे केस लपवण्यासाठी अनेक कृत्रिम प्रसाधनांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे केसांचे आणखीनच नुकसान होते. मात्र नारळाचे तेल आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाने केसांना मसाज केल्यास त्यांना पुरेसं पोषण मिळतं व केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. या मिश्रणाच्या नियमित वापरानेच हा फायदा होतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.