बोलें चुडिया…. पण हाताला झाली ॲलर्जी ? या घरगुती उपायांनी वाटेल बरं
हातात कडं किंवा बांगडी हातांचे सौंदर्य वाढते, परंतु उष्ण आणि दमट हवामानात यामुळे त्वचेची ॲलर्जी होऊ शकते.

Hand Jewellery Allergy : आपल्याकडे बऱ्याच महिला हातात बांगडी किंवा कडं (bangle or kada in hand)घालतात. त्यामुळे त्यांच्या हातांच्या सौंदर्यात भर पडते. पण काही वेळा घट्ट बांगड्या किंवा कडं घातल्यामुळे काही महिलांना ॲलर्जी (allergy) होऊ शकते. याचे कारण सोने किंवा धातूची ॲलर्जी देखील असू शकते. ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते, त्यांची ॲलर्जी बरी होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
यामुळेही त्वचेच्या ॲलर्जीची लक्षणे देखील दिसू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात हा त्रास जास्त वाढतो कारण या ऋतूत जास्त घाम येतो. त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. बांगड्या घातल्याने खाज येणे, पुरळ उठणे, लालसर होणे असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यावर काही घरगुती उपायही करू शकतात, ज्याच्या मदतीने ॲलर्जी दूर केली जाऊ शकते.
1) टी ट्री ऑईल वापरा
हातातील बांगड्या किंवा कड्यामुळे ॲलर्जी झाली असेल तर टी ट्री ऑइल लावावे. या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. टी ट्री ऑईल हे थोड्या नारळाच्या तेलात मिसळा. नंतर कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा आणि हे मिश्रण 30 मिनिटे राहू द्यावे. यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
2) कोरफडीचे जेल लावावे
कोरफडीच्या जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. संसर्ग किंवा जखमेच्या बाबतीत त्वचेवर घरगुती उपाय म्हणून याचा वापर केला जातो. कोरफडीच्या जेलचा (Aloe Vera Gel) वापर हा इन्फेक्शनमुळे होणा-या वेदना कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. एका भांड्यात कोरफड 15 मिनिटे ठेवा. यानंतर, जेल काढा आणि ते वेगळे करा. जेल त्वचेवर 30 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने तो भाग धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.
3) हातावर हळद लावा
हातात बांगडी किंवा सोन्याची बांगडी घातल्यामुळे ॲलर्जी झाली असेल तर हळदीचा वापर करा. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. तसेच त्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. हळद जंतुनाशक असते, ती लावल्याने त्वचेचा संसर्ग लवकर बरा होतो. हळदीत पाणी घालून जाडसर पेस्ट बनवून ती संसर्ग झालेल्या भागावर लावावे. नंतर वाळल्यावर पाण्याने स्वच्छ धुवावे.
4) बर्फही ठरेल उपयोगी
ब्रेसलेट किंवा बांगड्या घातल्यामुळे ॲलर्जीचा त्रास सतावत असेल तर त्यासाठी बर्फापेक्षा दुसरा उत्तम उपाय नाही. बर्फाच्या वपराने तुम्हाला वेदना, सूज, पुरळ यापासून आराम मिळेल. बर्फाचे क्यूब्स कापडात गुंडाळून त्वचेवर मसाज करा. दिवसातून ३ ते ४ वेळा हा उपाय केल्याने ॲलर्जी लवकर बरी होईल.
5) कडुनिंबाचा वापर ठरतो गुणकारी
हातात कडं किंवा बांगड्या घातल्यामुळे ॲलर्जी होत असेल तर कडुलिंबाचा वापर करा. कडुलिंबात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने उकळवून पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि 30 मिनिटे तशीच राहू द्यावी. नंतर साध्या पाण्याने तो भाग स्वच्छ धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसून येईल.
