चेहऱ्यावरील डागांमुळे त्रस्त आहात, मग आजच ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा

| Updated on: Mar 28, 2021 | 9:02 AM

चमकदार आणि नितळ त्वचा आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. परंतु, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.

चेहऱ्यावरील डागांमुळे त्रस्त आहात, मग आजच हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
Follow us on

मुंबई : चमकदार आणि नितळ त्वचा आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. परंतु, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे डार्क स्पॉट्स अर्थात काळे डाग काढून टाकण्यासाठी बर्‍याच प्रकारची उत्पादने बाजारात येतात. परंतु, ही उत्पादने किती प्रभावी आहेत, हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. (Try these home remedies to get rid of pimples on the face)

-त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी लिंबू अतिशय उत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन आणि लॅक्टिक अॅसिड असतं. लिंबू रसात दही मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. दही आणि लिंबूच्या पेस्टमध्ये थोडी साखर टाकून ती लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन हटवून चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

-पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

-चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा.

-कोरफड जेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील गडद काळे डाग दूर करण्यास मदत करतात. आपण कोरफड जेल थेट कोरफड वनस्पतीमधून काढून चेहऱ्यावर लावू शकतो. याशिवाय तुम्ही कोरफड जेलचा फेसमास्क देखील लावू शकता.

-ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

-दिवसभरात शरीरासाठी लागणारं पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. पाणी त्वचेचं सौदर्य राखण्यास, त्वचा चमकदार, ग्लोइंग करण्यास मदत करतं. परंतु पाणी पिताना शुद्ध पाणीचं प्यावे. त्यात अल्कोहोल, कार्बोनेटेड ड्रिंक्स मिसळू नये. दररोजच्या रुटीनमध्ये पाण्यासह विविध फळांचे रसही सामिल करु शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Try these home remedies to get rid of pimples on the face)