Homemade Body Scrub : मान्सूनमधील चिपचिप टाळायची असेल तर वापरा हा होममेड स्क्रब..

Body Scrub : मान्सूनमध्ये चिपचिप वाढल्याने त्वचेला खाज सुटू लागते. त्वचा स्वस्थ राखण्यासाठी नैसर्गिक बॉडी स्क्रब वापरा.

Homemade Body Scrub : मान्सूनमधील चिपचिप टाळायची असेल तर वापरा हा होममेड स्क्रब..
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 4:54 PM

Homemade Body Scrub : पावसाळ्याचा (monsoon) आवडतो. पाऊस आणि गार वाऱ्यामुळे गरमी कमी होते. पण या वातावरण आर्द्रता वाढल्याने चिकटपणाही वाढतो. त्वचेतील ओलावा वाढल्याने खाज सुटणे, पुरळ उठणे अशा त्वचेच्या समस्या सुरू होतात. नीट स्वच्छता राखली नाही तर काही लोकांना ॲलर्जीदेखील होऊ शकते. त्यासाठी डीप क्लिनिंग करून एक्‍सफोल‍िएट करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे डेड स्कीन (dead skin) निघून जाते.

लोक चेहऱ्यासाठी तर स्क्रब वापरतात, पण बाकीच्या शरीराची त्वचा एक्‍सफोल‍िएट करणे विसरतात. संपूर्ण शरीराच्या त्वचेला स्क्रबची गरज असते. अशा वेळी आपण घरी बनवलेला, नैसर्गिक स्क्रब वापरू शकतो. हा स्क्रब लावल्याने पावसाळ्यात तुम्हाला चिकटपणा आणि खाज यांचा त्रास जाणवणार नाही.

यासाठी फक्त तीन पदार्थांची गरज असते. ते म्हणजे साखर, मध व लिंबू. या स्क्रबमध्ये आर्द्रता शोषण्याचे गुणधर्म आहेत. या स्क्रबचा वापर करून त्वचेला अतिरिक्त ओलाव्यापासून वाचवता येते. मध हा एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असून तो त्वचा ताजी आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्याच्या मदतीने त्वचा निरोगी राहते. साखरेमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या मदतीने त्वचा चमकदार होण्यास मदत होते. तर लिंबामुळे धूळ-माती आणि प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण होते. लिंबांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेला हेल्दी बनवते.

कसा तयार करावा स्क्रब ?

एका बाऊलमध्ये 3 चमचे साखर घ्यावी. नंतर त्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस घालावा. हे तिनही घट नीट मिक्स करावेत. बॉडी स्क्रब तयार आहे. हा स्क्रब एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवून एक आठवडा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता.

कसा करावा स्क्रबचा वापर ?

तयार केलेला हा स्क्रब आपल्या त्वचेवर लावून दोन मिनिटे हलक्या हाताने मालिश करावे. त्यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुवावी. अंग पुसून कोरडे करून त्वचेवर मॉयश्चरायझर लावायला विसरू नका. नियमित वापराने फरक दिसून येईल.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.