AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या आजूबाजूला सापाचा वावर? हे औषध फवारा आणि मिळवा सापांपासून सुटका

पावसाळ्यात सापांचा वावर वाढतो. नागासारख्या विषारी सापांचा धोका जास्त असतो. अशा वेळी उपाय म्हणून एका किटकनाशकाचा देखील वापर होऊ शकतो. आता ते किटकनाशक कोणते जाणून घ्या...

घराच्या आजूबाजूला सापाचा वावर? हे औषध फवारा आणि मिळवा सापांपासून सुटका
| Updated on: Jun 28, 2025 | 1:14 PM
Share

पावसाळा सुरू होताच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. सर्वत्र हिरवळ आणि ओलावा वाढल्याने सापांचा वावर वाढतो. विशेषतः जिथे शेतात काळ्या नागासारखे अत्यंत विषारी साप आढळतात, तिथे धोका आणखी वाढतो. दिवसभर शेतात कष्ट करणारे शेतकरी सर्वाधिक धोक्यात असतात. तसेच शेतात असणाऱ्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला देखाला भीती असते. अशा परिस्थितीत शेतकरी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाय करतात.

हा खास उपाय करा?

एका शेतकऱ्याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ते आणि गावातील इतर शेतकरी शेतात सापांपासून बचावासाठी एक खास औषध वापरतात. या औषधाला फोरेट असे नाव आहे. शेतकऱ्याच्या मते, फोरेटचा वास इतका तीव्र असतो की साप शेतात येण्यास घाबरतात. हे औषध शेताच्या काठावर टाकले जाते. कधीकधी आम्ही घराच्या कुंपणावर चारही बाजूने टाकतो.

वाचा: तुम्हाला माहित आहे साप स्वत:लाच चावतो? 99 लोकांना माहिती नसणार, कारण बसेल धक्का

शेताच्या आत किंवा पिकांमध्ये याचा वापर केला जात नाही. एक किलोचा पॅकेट 100 ते 150 रुपयांत कीटकनाशक दुकानात सहज मिळते. एकदा टाकल्यानंतर त्याचा परिणाम सुमारे 10 ते 15 दिवस टिकतो. तसेच हे औषध विषारी असल्याने वापरताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. हे औषध कधीही घरात ठेवू नये आणि मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावे. जर घरात पशू असतील आणि जिथे हे औषध टाकले आहे तिथून चारा आणला जात असेल, तर तो चारा पशूंना खाऊ घालू नये.

आसपास साप फिरकत नाहीत

या औषधामुळे पिकांचे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु जमिनीतील उपयुक्त जिवाणू यामुळे मरतात. तथापि, याचा एक फायदा असा आहे की शेतात लागणारे कीटक आणि किडे यामुळे मरतात किंवा दूर राहतात. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसाळ्यात हे औषध खूप फायदेशीर ठरते. परंतु याचा वापर नेहमी सावधगिरीनेच करावा. शेताच्या काठावर फोरेट टाकल्याने नागासारखे धोकादायक साप शेताजवळ येत नाहीत आणि शेतकरी सुरक्षितपणे आपले काम करू शकतात.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा