उन्हाळ्यात केस चिकट न होता राहतील निरोगी, फक्त ‘या’ हलक्या आणि पोषण देणाऱ्या तेलांचा करा वापर

उन्हाळ्यातही तुमच्या केसांना आर्द्रतेची गरज असते, पण दमट हवामानात हलके तेल लावणे उत्तम ठरते. यामुळे चिकटपणा कमी होतो आणि केस निरोगी राहतात. चला अशा पाच तेलांबद्दल जाणून घेऊया जी उन्हाळ्याच्या दिवसात तुमचे केस निरोगी ठेवतील.

उन्हाळ्यात केस चिकट न होता राहतील निरोगी, फक्त या हलक्या आणि पोषण देणाऱ्या तेलांचा करा वापर
hair
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 4:07 PM

उन्हाळा म्हटलं की त्वचेपासून केसांच्या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात. कारण या दिवसांमध्ये वातावरण अधिक उष्ण असते ज्याचा परिणाम आपल्यावर होतो. तर उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांच्या समस्या खूप सतावत असतात. कारण उन्हाळ्यात स्कॅल्पला खूप घाम येतो. त्यात जर जड तेल लावल्याने तुमचे केस खूप चिकट होतात. हे तेल स्कॅल्पवर जमा होऊन त्वचेची छिद्रे बंद करू शकतात, यामुळे चिकट कोंडा आणि खाज येऊ शकते. पण तुम्ही जर केसांना हलकी तेलांचा वापर केल्यास ते स्कॅल्पमध्ये लवकर शोषली जातात आणि त्यामुळे केस जास्त तेलकट वाटत नाहीत. हलकी तेलं स्कॅल्पला आर्द्रता देतात उन्हामुळे होणारा कोरडेपणा कमी करतात आणि त्वचेची छिद्रे बंद होण्यापासून रोखतात. या लेखात आपण अशा पाच नैसर्गिक तेलांबद्दल जाणून घेणार आहोत जी हलकी असून उन्हाळ्या तुमच्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

ज्याप्रमाणे तुमच्या त्वचेला प्रत्येक ऋतूत मॉइश्चरायझरची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या केसांनाही आर्द्रतेची गरज असते. काही लोकं स्कॅल्पमधील तयार होणाऱ्या तेलकटपणाच्या भीतीने उन्हाळ्यात केसांना तेल लावणे टाळतात, पण यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू शकतात. तुम्ही आठवड्यातून एकदा, शॅम्पू करण्याच्या 1 तास आधी केसांना तेल लावू शकता.

रोझमेरी तेल

उन्हाळ्यात केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही रोझमेरी तेलाने केसांना मालिश करू शकता. हे तेल हलके असून केसांच्या वाढीस चालना देण्यासही मदत करते. या तेलांच्या फायद्यांमुळे हहेअर केअर करणाऱ्या प्रोडक्टमध्येही रोझमेरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

ग्रेप सीड ऑइल

द्राक्षाच्या बियांचे तेल केसांसाठीही फायदेशीर आहे. याचा वापर स्वयंपाक आणि त्वचेची काळजी या दोन्हीसाठी केला जातो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, या तेलाच्या वापराने केसांच्या वाढीस चालना मिळते. उन्हाळ्यात तुमच्या केसांसाठी हे एक उत्तम आणि हलके तेल आहे.

आवळा तेल

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या केसांना आवळ्याचे तेल लावू शकता. हे एक हलके तेल आहे जे टाळूचे पोषण करते आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जाते. यामुळे तुमचे केस खूप चिकटही होत नाहीत आणि केस मजबूत करते. आवळ्याचे सेवन करणे आणि त्याच्या पावडरचे पॅक लावणे हे देखील तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे आणि प्राचीन काळापासून केसांच्या देखभालीसाठी याचा वापर केला जात आहे.

टी ट्री ऑइल

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या केसांसाठी टी ट्री ऑइलचा वापर देखील करू शकता. हे हलके तेल अँटीफंगल विरोधी गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे. ज्यांना उन्हाळ्यातही कोंड्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. ते सहजपणे शोषले जाते आणि त्वचेची छिद्रे बंद करत नाही. फक्त हे लक्षात ठेवा की ते नेहमी खोबरेल तेल किंवा जोजोबा तेलासारख्या वाहक तेलासोबत लावावे. काही मिनिटे मसाज करा. एक तास तसेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू लावा.

आर्गन तेल

आर्गन तेल केसांसाठी उत्कृष्ट मानले जाते कारण ते केसांना चमक आणते. आर्गन झाडाच्या फळांच्या बियांपासून काढलेले हे तेल फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि अनेक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून ते वजनाने हलकेही असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us