Valentine Week List 2024 : कालपासून ‘वैलेंटाईन वीक’ला सुरूवात, कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा होणार

  7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week)  सुरू झाला आहे. या वैलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. त्याच वेळी, दुसरा प्रपोज डे... शेवटी व्हॅलेंटाईन डे येतो.

Valentine Week List 2024 : कालपासून 'वैलेंटाईन वीक'ला सुरूवात, कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा होणार
वैलेंटाईन वीक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:49 PM

मुंबई : प्रेम हा अडीच अक्षरांचा शब्द इतका शक्तिशाली आहे की तो विभाजित जगाला एकत्र आणू शकतो. याच प्रेमाचा सप्ताह कालपासून सुरू झाला आहे. हा संपूर्ण सप्ताह तरूणाई मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.  7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week)  सुरू झाला आहे. या वैलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. त्याच वेळी, दुसरा प्रपोज डे… शेवटी व्हॅलेंटाईन डे येतो. अशा प्रकारे, प्रेमात पडलेले लोक वेगवेगळ्या दिवसांनुसार एकूण 7 दिवस तो साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीकची संपूर्ण यादी जाणून घ्या.

अशा प्रकारे साजरा करा वैलेंटाईन वीक

7 फेब्रुवारी- रोझ डे : व्हॅलेंटाईनचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीवर अपार प्रेम करता त्या व्यक्तीला तुम्ही लाल गुलाब देऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

8 फेब्रुवारी- प्रपोज डे : व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. तरूणाई या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. प्रेम व्यक्त करणाऱ्यांसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. जर तुमचे कोणावर अपार प्रेम असेल तर ते या दिवशी व्यक्त करा.

हे सुद्धा वाचा

9 फेब्रुवारी – चॉकलेट डे : व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, प्रेमी युगूल एकमेकांना खास चॉकलेट्स, चॉकलेट गुच्छे, चॉकलेट बास्केट भेट देऊन हा दिवस खास बनवू शकतात.

10 फेब्रुवारी- टेडी डे : मुलींना टेडी खूप आवडतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच अनेक प्रकारचे छोटे-मोठे टेडी बाजारात उपलब्ध होऊ लागतात. व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा खास मित्राचा दिवस त्यांना टेडी देऊन खास बनवू शकता.

11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे : कोणतेही नाते तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही त्या नात्याबाबत दिलेली वचने पूर्ण करता. व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी आयुष्यभर एकमेकांवर प्रेम आणि समर्पण करण्याचे वचन देतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वचन देऊन त्याचा दिवस खास बनवू शकता.

12 फेब्रुवारी- हग डे : मिठी मारणे तुमच्या नात्यातील प्रेम दर्शवते. अनेक संशोधनातून असेही समोर आले आहे की मिठी मारणे तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना मिठी मारून प्रेम व्यक्त केले जाते.

13 फेब्रुवारी- कीस डे : 7 वा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीचे हात आणि कपाळाचे चुंबन घेऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता आणि तिला सांगू शकता की तुमचे आयुष्य फक्त तिच्यासोबत आहे. यामुळे तुमच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड स्पेशल वाटेल.

14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे :  व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे जो 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास आहे. या दिवशी, जोडपे एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतात आणि एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करतात किंवा कुठेतरी बाहेर जातात. या दिवशी लोकं आपल्या जोडीदारांना भेटवस्तू देखील देतात. हा दिवस त्यांच्यासाठी किती खास आहे याची जाणीव करून देण्याचाही ते प्रयत्न करतात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.