AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shashtra: रात्री उशीखाली ‘या’ गोष्टी ठेवून झोपल्यास तुमचं नशीब चमकेल….नक्की ट्राय करा

Vastu Tips: बरेच लोक जीवनावश्यक वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत ठेवून झोपतात. परंतु वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. काही गोष्टींमुळे तुम्हाला फायदा होतो, तर अनेक गोष्टी तुमच्यासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत वास्तूच्या कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजेल जाणून घ्या.

Vastu Shashtra: रात्री उशीखाली 'या' गोष्टी ठेवून झोपल्यास तुमचं नशीब चमकेल....नक्की ट्राय करा
| Edited By: | Updated on: Jan 27, 2025 | 6:58 PM
Share

हिंदूधर्मामध्ये वास्तूशास्त्राला भरपूर महत्त्व दिले जाते. वास्तू प्रमाणे तुमचं घर सजवल्यास तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते. वास्तूच्या नियमांचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेकदा आर्थिक चणचण भासते आणि महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येण्यास सुरुवात होते. वास्तू शास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत ज्याचे पालन केल्यास तुमचं आयुष्य सुरळीत राहाते. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या रोज रात्री झोपताना उशीखाली ठेवून झोपल्याने तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत, ज्या झोपताना चुकूनही सोबत ठेवू नयेत, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

वास्तूशास्त्राच्या मान्यतेनुसार, तुम्ही रात्री झोपताना तुमच्या पलंगावर पाण्यानी भरललेले तांब्याचे भांडे किंवा बॉटल ठेवावी. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी बालकनीतील झाडाला अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे तुमची आयुष्यामध्ये प्रगती होण्यास सुरुवात होते आणि आयुष्यामध्ये नवीन संधीं मिळण्यास सुरुवात होते. तुमच्या जीवनातील सकारात्मकता वाढते.

आजकाल काही लोकांना अनेक प्रयत्न करून देखील नीट झोप येत नाही. रात्री नियमित झोप न मिळाल्यामुळे दिवसभर चिडचिड होते. रोज नियमित झोप नाही मिळाल्या तुमच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशी खाली एक हिरवी वेलची ठेऊन झोपू शकता. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागते आणि तुमच्या आरोग्यालाही त्याचा खूप फायदा होतो. तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीचे नाणे जवळ ठेवून पूर्वेकडे तोंड करून झोपावे. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होते आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहाते. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि तु्म्हाला आर्थिक चणचण भासत नाही. त्यासोबतच रात्री झोपताना तुमच्या उशी जवळ हळदीचा गोळा ठेवल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.

अनेकांना फोन, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. परंतु या गोष्टी रात्री झोपचाना जवळ ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक वस्तू रात्री झोपल्यावर जवळ ठेवल्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक उर्जा वाढते. इलेक्ट्रॉनिक वस्तू रात्री झोपताना जवळ ठेवल्यामुळे तुमच्या आरोग्यवरही गंभीर परिणाम होतो. त्यासोबतच चामड्यापासून बनवलेल्या वस्तू तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्यामुळे नकारात्मकता वाढते आणि वास्तूशास्त्रामध्ये अशुभ देखील मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा