रोज केवळ 11 मिनिटे पायी चाला; शरीरात दिसतील हे फरक, 30 मिलियन लोकांवर केला प्रयोग
रोज फक्त 11 मिनिटे पायी चालल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात. आणि शरीरात फक्त आतूनच नाही तर बाहेरून देखील हे फरक जाणवू लागतात. एव़ढंच नाही तर हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ जाऊ शकतो.

आपण हे अनेकदा ऐकलं असेल की चालणे अत्यंत फायदेशीर आहे. म्हणूनच आरोग्य तज्ञ सर्व वयोगटातील लोकांना दररोज चालण्याचा सल्ला देतात. वॉक करणं म्हणजे पायी चालणं ही फीट राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सगळ्यात चांगली एक्सरसाईज मानली जाते. पायी चालणं ही सगळ्यात सोपी आणि फायदेशीर एक्सरसाईज असते. वजन कमी करण्यासाठी किंवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती पायी चालावं यावर वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. अशात आता आणखी एक रिसर्च समोर आला आहे.
हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ जाऊ शकतो
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित लेखानुसार, संशोधकांनी सांगितलं की, रोज केवळ 11 मिनिटे म्हणजे आठवड्यातून 75 मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने म्हणजे वेगाने पायी चालल्याने हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ जाऊ शकतो. हा रिसर्च जवळपास 30 मिलियन लोकांवर करण्यात आला होता. यामुळे तुमचे हृदयाचे आरोग्य सुधारते. मानसिक आरोग्य सुधारते आणि तुमचा मूड देखील सुधारतो. शरीराला अंतर्गत फायदे देण्यासोबतच, दररोज फक्त 11 मिनिटे चालल्याने तुमच्या शरीरात काही बाह्य बदल देखील दिसून येतात.
अकाली मृत्यूपासूनही बचाव केला होऊ शकतो.
रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, रोज केवळ 11 मिनिटे वॉक करूनही तुम्ही कार्डिओवस्कुलर डिजीजचा धोका 17 टक्क्यांनी कमी होतो आणि कॅन्सरचा धोका 7 टक्क्यांनी कमी होतो. अभ्यासकांना आढळलं की, याने अकाली मृत्यूपासूनही बचाव केला होऊ शकतो.
शरीरात नेमके काय आणि कसे बदल घडतात?
चांगली मुद्रा जेव्हा तुम्ही दररोज 11 मिनिटे चालता तेव्हा तुमच्या शरीराच्या पोश्चरमध्ये फरक दिसून येतो. चालण्यामुळे तुमच्या पाठीचे आणि पायांचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे पोश्चर सुधारते. याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम होतो.
वजन कमी होणे चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे तुमचे शरीर अधिक तंदुरुस्त दिसते. अनेक अहवालांचे निकाल असे दर्शवतात की चालण्यामुळे चयापचय वाढतं, ज्यामुळे तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत होते आणि त्यामुळे तुमचे वजन संतुलित राहते.
टोन्ड पाय चालण्याचा शरीराच्या खालच्या भागावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे पायांचे स्नायू, विशेषतः पिंडऱ्या, हॅमस्ट्रिंग आणि मांड्या मजबूत होतात. तसेत जेव्हा तुम्ही नियमितपणे चालता, म्हणजेच दररोज चालत राहता, तेव्हा थोड्याच वेळात तुमचे पाय टोन्ड दिसू लागतात.
चमकणारी त्वचा तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दररोज फक्त 11 मिनिटे चालल्याने तुमची त्वचा चमकू लागते. कारण चालण्यामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे तुमच्या त्वचेला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढते आणि त्वचा चमकदार दिसते.
उत्साही वाटतं या सर्वांव्यतिरिक्त, दररोज चालण्याने शरीरातील उर्जेची पातळी देखील वाढते. जेव्हा तुम्ही उत्साही असता तेव्हा तुम्ही अधिक ताजेतवाने दिसता. तुमचा चेहरा आणि डोळे तेजस्वी राहतात आणि तुम्ही अधिक सक्रिय, उत्साही दिसता. म्हणजेच, चालण्यामुळे शरीराचा एकूण आकार सुधारतो.
