Mumbai Market: नवरात्रीत दिसायचंय खास, मुंबईतील ‘या’ मार्केटमध्ये कमी किमतीत सर्वोत्तम कपडे
मुंबई महाग आहे असं सर्वांना वाटतं पण मुंबईत अनेक परवडणारे मार्केट आहेत जिथे तुम्ही मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात कपडे आणि वस्तू खरेदी करू शकता. या मार्केटमध्ये तुम्हाला नवीनतम आणि ट्रेंडी वस्तू सहज मिळतील.

Mumbai Best Market: नवरात्री सोमवारपासून सुरु होत आहे. नवरात्रीत मुंबई दांडिया रात्रींनी गजबजलेली असते. म्हणून प्रत्येकाला खास लूक करायचा असतो. दिवाळी आणि इतर सण जवळ येत असल्याने, प्रत्येकजण खरेदीसाठी उत्सुक आहे. म्हणतात की मुंबई शहर खूप महाग आहे आणि जर तुम्ही इथे खरेदी करायला गेलात तर तुमचा खिसा रिकामा होतो. पण असं काहीही नाही. मुंबईत जर तुम्हाला कमी किमतीत उत्तम खरेदी करायची असेल, तर चला आम्ही तुम्हाला मुंबईतील अशा अनेक स्वस्त बाजारपेठांमध्ये घेऊन जाऊ जिथे तुम्ही खूप कमी पैशात उत्तम खरेदी करू शकता.
लोखंडवाला मार्केट : उत्सवाच्या खरेदीसाठी, मुंबईतील लोखंडवाला मार्केटला नक्की भेट द्या. लोखंडवाला मार्केटमध्ये खरेदीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. येथे तुम्ही कपड्यांपासून ते फुटवियर आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व काही परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. येथे तुम्ही खूप बार्गेनिंग करू शकता आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही स्ट्रीट फूडचा आनंद देखील घेऊ शकता.
हिल रोड : नवरात्रीच्या खरेदीसाठी, वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड मार्केटला नक्की भेट द्या. स्थानिकांमध्ये हे एक आवडते मार्केट आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व नवीनतम ट्रेंड सहज मिळू शकतात ते सुद्धा परवडणाऱ्या किमतीत. येथील फुटवेअर मार्केटला खूप मागणी आहे आणि मुलांचे कपडे खरेदी करण्यासाठी तुम्हाला येथे अनेक पर्याय मिळतील.
फॅशन स्ट्रीट : नावाप्रमाणेच, हे मार्केट प्रत्येक फॅशन ट्रेंडसाठी कपडे आणि अॅक्सेसरीज परवडणाऱ्या किमतीत मिळतात. स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये हे मार्केट खूप लोकप्रिय आहे. येथे, तुम्हाला प्रत्येक मोठ्या ब्रँडची फर्स्ट कॉपी अगदी कमी किमतीत मिळतील.
लिंकिंग रोड : लिंकिंग रोड हे मुंबईतील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम बाजारपेठ आहे. येथे तुम्ही कपड्यांपासून ते फुटवियर आणि दागिन्यांपर्यंत प्रत्येक सर्वकाही खरेदी करू शकता. पण, येथे विकल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू ओरिजिनल ब्रांडच्या कॉपी असतात.
कोलाबा कॉजवे : दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे हा मुलींमध्ये आवडता आहे. तो एक लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहे. येथे तुम्हाला कपडे आणि अॅक्सेसरीजची असंख्य पर्याय मिळतील, तसंच दर्जेदार फुटवियर देखील मिळतील. तुम्ही विविध प्रकारच्या अन्नाचा आस्वाद देखील येथे घेऊ शकता.