AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs CSK: यलो आर्मीला 1 चूक प्रचंड महागात, चेन्नईला 37 धावांचा फटका, काय झालं? पाहा व्हीडिओ

DC vs CSK IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चिवट गोलंदाजी केली. मात्र नूर अहमद याने केलेल्या एका चुकीमुळे चेन्नईला 37 धावांचं नुकसान झालं. नूरकडून नक्की काय चूक झाली? जाणून घ्या.

DC vs CSK: यलो आर्मीला 1 चूक प्रचंड महागात, चेन्नईला 37 धावांचा फटका, काय झालं? पाहा व्हीडिओ
Noor Ahmed DC vs CSK IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 05, 2026 | 10:56 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सुमार फिल्डिंग सुरुच आहे. या मोसमाआधी प्रत्येक हंगामात खेळाडूंनी कॅच ड्रॉप केल्या आहेत. मात्र 19 व्या मोसमात तर खेळाडूंनी कहर केला आहे. या हंगामात जणू खेळाडूंमध्ये कॅच सोडण्याची स्पर्धाच सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्सला दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या सामन्यात त्यांच्या एका खेळाडूने केलेली एक चूक चांगलीच महागात पडली आहे. चेन्नईच्या खेळाडूने दिल्लीच्या ट्रिस्टन स्टब्स याचा सोपा कॅच सोडला. त्यामुळे चेन्नईला तब्बल 37 धावांचा फटका बसला. चेन्नईच्या खेळाडूने कॅच सोडल्याने दिल्लीला 150 पार मजल मारता आली. दिल्लीने अरुण जेटली स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 155 धावा केल्या. चेन्नईच्या खेळाडूकडून नक्की काय चूक झाली? हे सविस्तर जाणून घेऊयात.

नूर अहमदकडून घोडचूक

नूर अहमद याने दिल्लीच्या डावातील 11 व्या ओव्हरमध्ये कॅच सोडली. गुरजनप्रीत सिंग याने टाकलेल्या बॉलवर ट्रिस्टन स्टब्स याने फटका मारला. स्टब्सने जिथे फटका मारला तिथे नूर उभा होता. मात्र नूरने ट्रिस्टनचा कॅच सोडला. नूरने कॅच सोडला तेव्हा ट्रिस्टन 1 धावेवर खेळत होता. मात्र त्यानतंर ट्रिस्टनने त्याला मिळालेल्या जीवनदानाचा पूर्ण फायदा घेतला. ट्रिस्टनने एकूण 38 धावांची खेळी केली. ट्रिस्टनने या 38 धावांच्या खेळीत 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोर लगावला. अशाप्रकारे चेन्नईला नूरची एक चूक 37 धावांनी महागात पडली. नूरच्या या एका चुकीचा फायदा घेऊन ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

सहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

ट्रिस्टन आणि समीर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी दिल्लीच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी केली. दोघांनी 47 बॉलमध्ये 65 रन्स जोडल्या. समीर रिझवीने या दरम्यान दिल्लीसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. समीरने 24 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. समीरने या 40 पैकी 24 धावा या षटकारांच्या मदतीने केल्या. समीरने 4 षटकार लगावले.

नूर अहमदकडून ट्रिस्टन स्टब्सला जीवनदान

2 गुणांसाठी जोरदार चुरस

दरम्यान दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांची या मोसमात नेट रनरेटचा अपवाद वगळता सारखीच कामगिरी राहिली आहे. चेन्नई आणि दिल्लीने या मोसमात आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या आणि दिल्ली सातव्या स्थानी आहे. दिल्ली आणि चेन्नईपैकी जिंकणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आपला दावा मजबूत करेल. तर पराभूत संघाचं प्लेऑफचं आव्हान आणखी अवघड होईल. त्यामुळे कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल