Summer Drink | शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच अनेक आजारांना पळवून लावेल ‘कलिंगडाचा रस’!

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन, या समस्येवर मात करण्यासाठी कलिंगडापेक्षा चांगले फळ नाही. या फळात 92 टक्के पाणी असते, जे शरीर हायड्रेट करण्याबरोबर त्वरित ऊर्जा देते.

Summer Drink | शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच अनेक आजारांना पळवून लावेल ‘कलिंगडाचा रस’!
कलिंगडाचा रस
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 2:32 PM

मुंबई : उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन, या समस्येवर मात करण्यासाठी कलिंगडापेक्षा चांगले फळ नाही. या फळात 92 टक्के पाणी असते, जे शरीर हायड्रेट करण्याबरोबर त्वरित ऊर्जा देते आणि सर्व त्रासांना प्रतिबंध करते. जर, आपण दररोज कलिंगड खाऊ शकत नसाल, तर त्याचा रस आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा (Watermelon Juice is the best option for summer drink).

कलिंगडाच्या रसाद्वारे शरीरात अनेक पोषक घटक पोहोचतात. मूत्रपिंडाच्या समस्यांपासून ते कर्करोगापर्यंतच्या समस्यांमधून आराम मिळतो आणि शरीराला ताजेतवाने वाटते. जर कलिंगडाच्या रसात काळे मीठ आणि मिरपूड मिसळले, तर ते अधिक फायदेशीर ठरते. चला तर, जाणून घेऊया कलिंगडाच्या रसाचे फायदे…

कर्करोग प्रतिबंध

कलिंगडामध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडेंट असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगाचा धोका कमी करते. सर्व आयुर्वेद तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर कर्करोगाच्या रुग्णांनी काळी मिरी मिसळलेला कलिंगडाचा रस प्यायला, तर कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.

हृदयरोगाचा धोका कमी होतो

कलिंगडामध्ये बीपी नियंत्रित करणाऱ्या फोलेटचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त, कलिंगडात कोलेस्टेरॉल कमी करणारे पोषक घटक असतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो (Watermelon Juice is the best option for summer drink).

वजन कमी करण्यास उपयुक्त

लठ्ठपणा हे सर्व रोगांचे मूळ आहे. जर आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल, तर आहारात कलिंगडाचा रस प्या. हे आपल्याला ऊर्जा देखील देईल आणि वजनही कमी करेल.

मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

कलिंगडामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी -1, बी -2, बी -3, बी -5 आणि बी -6 यासारखे बरेच पोषक घटक असतात. कलिंगडाचा रस शरीरातील विषारी घटक काढून टाकतो. ज्या लोकांना किडनीची समस्या आहे, त्यांनी दिवसातून दोनदा कलिंगडाचा रस प्यायला पाहिजे.

उष्माघातापासून रक्षण

उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका अधिक असतो. उष्माघातामुळे शरीरात डिहायड्रेशनचा त्रास होतो. कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. म्हणूनच, उन्हाळ्यात हेल्दी पेय म्हणून आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. आपण इच्छित असल्यास, त्यात पुदीन्याची ताजी पाने देखील घालू शकता.

अकाली वृद्धत्व रोखते

कलिंगडामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे पिण्यामुळे त्वचा बर्‍याच काळासाठी चमकदार आणि ताजीतवानी होते. यामुळे अकाली वृद्धत्व टाळते.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Watermelon Juice is the best option for summer drink)

हेही वाचा :

Healthy Breakfast | नेहमी तंदुरुस्त राहायचंय? मग नाश्त्यात खा ‘हे’ भारतीय पदार्थ!

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.