तुम्हीही ६ तासांपेक्षा अधीक काळ एका जागी बसून असता का ? तर हे ‘साइड इफेक्ट’ एकदा नक्की वाचा
6 ते 8 तासांपेक्षा जास्त एका जागी बसल्यामुळे किंवा शारीरिक हालचाल न झाल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. इन्सुलिन प्रतिरोधक आणि टाइप 2 मधुमेह विकसित होण्याचा उच्च धोका. वजन वाढण्यास आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरते. नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्य कमी होण्याशी जोडलेले आहे.

तुम्ही दररोज 6 तास किंवा त्याहून जास्त वेळ सतत बसत असाल तर सावध व्हा. यामुळे तुमच्या आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम होऊ शकतो. नुसते बसुन न राहता एकदातरी उठून फिरा, हलका व्यायाम करा आणि तुमचे शरीर सक्रिय ठेवा जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकाल. आजच्या जीवनात एकाजागी तासन्तास बसून काम करणे नॉर्मल झाले आहे. ऑफिस असो किंवा घर, लोक लॅपटॉप आणि मोबाईल वापरत सतत 6 ते 8 तास आरामात काढतात, पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त वेळ बसून राहणे तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक आहे. रीसर्चमध्ये असे दिसून आले आहे की जे लोक दररोजच्या जीवनात 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतो आणि ते कसे टाळता येईल ते जाणून घेऊया.
वजन वाढण्याचा धोका
तासनतास एकाच जागी बसून राहिल्यास शरीरातील कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते आणि वजन झपाट्याने वाढते.
हृदयरोगाचा धोका
रिसर्च मध्ये असे दिसून आले आहे की जास्त वेळ बसल्याने हृदयविकाराचा धोका 30% वाढू शकतो. याचे कारण असे की, सतत बसुन राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
मधुमेहाचा धोका वाढतो
जे लोक जास्त वेळ बसतात, त्यांची मेटाबोलीसम मंदावते. यामुळे शरीराची इन्सुलिन बनण्याची क्षमता कमी होते आणि रक्तातील glucose पातळी वाढते, ज्यामुळे टाइप-2 डायबीटीस होण्याची शक्यता वाढते.
पाठ आणि मानेचा त्रास
सतत बसल्याने पाठीच्या कण्यावर दबाव वाढतो, ज्यामुळे पाठदुखी, आणि मान ताठ होऊ शकते. जास्त वेळ चुकीच्या स्थितीत बसल्याने मणक्याचा त्रास होऊ शकतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम
सारखे बसणे आणि शारीरिक हालचालीं कमी करणे यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे स्ट्रेस, चिंता आणि नैराश्याच्या समस्या वाढू शकतात.
हे टाळण्यासाठी योग्य मार्ग आहेत दर 30-40 मिनिटांनी ब्रेक घ्या
5 ते 6 मिनिटे चाला किंवा नॉर्मल स्ट्रेचिंग करा. तुमचे वर्कस्टेशन बदला उभे असताना काम करण्याचा प्रयत्न करा.
शारीरिक हालचाली वाढवा
ऑफिस किंवा घरात चालताना लिफ्ट वारण्याऐवजी शिड्या वापरा. व्यायामाची सवय लावा दररोज किमान ३० मिनिटे चाला किंवा योगासने करा