AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वर्ण भस्मयुक्त तूप म्हणजे काय ? या तूपाचे फायदे अनेक

सुवर्ण भस्मयुक्त तूप अत्यंत आरोग्यदायी तूप आहे, या तूपाची शुद्धता त्यातील सुवर्ण भस्माच्या शुद्धतेवर अवलंबून असते असे आयुर्वेदिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हल्लीच्या प्रदुषणयुक्त वातावरणात आपली ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुवर्ण भस्म तुप फायदेशीर असल्याचे न्युट्रीशियन्सचे म्हणणे आहे.

स्वर्ण भस्मयुक्त तूप म्हणजे काय ? या तूपाचे फायदे अनेक
| Updated on: Jul 18, 2024 | 4:36 PM
Share

आपण अनेक गायीचे तूप किंवा म्हशीच्या दूधापासून तयार केलेले तूप पाहीले असेल परंतू स्वर्ण भस्मयुक्त तूप म्हणजे काय ? या तूपाचा आरोग्याला काय लाभ होतो ? याविषयी फारसे कधी ऐकले नसेल. स्वर्ण भस्मयुक्त तुपाला सध्या खूप मागणी आहे. या तपामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि प्रदूषणाने भरलेल्या वातावरणात जगण्याची नवीन उर्मी मिळते. हे स्वर्ण भस्म तूप जर तु्म्ही अश्वगंधा सोबत सेवन केले तर खूपच लाभ होतो. नवा जोश भरला जातो. परंतू स्वर्ण भस्मयुक्त तुपातील सोन्याचं भस्म खूपच शुद्ध असले पाहीजे ही एक अट आहे , तरच या स्वर्णभस्मयुक्त तुपाचा खरा लाभ मिळतो अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

आयुर्वेदात सोने हे आरोग्य सुधारण्यासाठी हजारो वर्षांपासून वापरले जात आहे. या आरोग्याच्या पुनरुत्थानासाठी सोन्याचा धातू खूपच गुणकारी आणि शक्तिशाली घटक मानला जाता, सोन्याच्या धातूतील रासायनिक गुण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत ,जे नैसर्गिक नवचैतन्य आणणारे आहेत असे आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतू सुवर्ण भस्म तुपात वापरलेले सुवर्ण भस्म अत्यंत पावडरीच्या स्वरुपात असेल पाहीजे. ते आपल्या हातांच्या बोटांच्या रेषांत देखील गेले पाहीजे इतके बारीक पावडरयुक्त हवे. सुवर्ण भस्मयुक्त तूपातील तूप देखील शुद्ध असायला हवे असे आयुर्वेदातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

येथे पाहा इंस्टाग्राम पोस्ट –

शुद्धता ओळखण्यासाठी टिप्स

तुपात वापरलेले भस्म अत्यंत बारीक असले पाहिजे, तुमच्या बोटांच्या रेषांत ते गेले पाहीजे आणि ते दृश्यमान असले पाहिजे. त्यात सोन्याची चमक नसावी, कारण भस्म तयार झाल्यावर त्याची सोन्याची चमक कमी होते. तसेच या भस्माचे पुन्हा सोन्यात रुपांतर करता येणे कठीण असावे. खरे सुवर्ण भस्म अपरिवर्तनीय असते. म्हणजे भस्माचे रूपांतर पुन्हा धातूमध्येच होऊ शकत नाही. तसेच,हे भस्म हलके असले पाहिजे आणि पाण्यावर तरंगले पाहिजे,’ आयुर्वेदात  म्हटले आहे. सुवर्ण भस्म तूपाला जर अश्वगंधासोबत सेवन केले तर ते कामोत्तेजक म्हणून देखील काम करते,त्यामुळे थकवा दूर होऊ लैंगिक आरोग्य सुधारते. स्वर्ण भस्म दुधासोबत मिसळल्यास आपली ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी सुवर्ण भस्म तुप एक वरदान असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

*  कर्करोगास प्रतिबंध करते आणि त्वरीत बरे होण्यास मदत करते

*  स्मरणशक्ती आणि त्वचा उजळविते

*   मूड आणि ऊर्जा पातळी वाढवते

*   हार्मोन्स समतोल राखण्यास मदत होते

*    शांत झोप देते

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढविते
  • त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते
  •  शक्ती आणि नवचैतन्य देते
  •  प्रजनन  क्षमता वाढवते ( स्त्री आणि पुरुष दोघांसाठी )
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.