AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात जुनी शाळा पुन्हा पुन्हा दिसते का? जाणून घ्या काय आहेत संकेत, तुमच्यावर काय होईल परिणाम

तुम्हाला रोज स्वप्नात सारखी तुमची जुनी शाळा दिसते असेल तर हे स्वप्न पडण्याचं नेमकं कारण काय असू शकतं. या स्वप्नामागे कोणतं कारण असू शकत असे स्वप्न पाहण्याचा अर्थ काय असू शकत? हे स्वप्न तुम्हाला नेमकी काय दर्शवते?

स्वप्नात जुनी शाळा पुन्हा पुन्हा दिसते का? जाणून घ्या काय आहेत संकेत, तुमच्यावर काय होईल परिणाम
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 7:53 PM
Share

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा काहींना काही अर्थ असतोच. स्वप्नात आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडताना पाहतो. अनेकदा तुम्हाला स्वप्नात जुन्या गोष्टी दिसत असतात. तुमच्या लहापणीचे दिवस आवडणारी वस्तू ह्या सगळ्याचे कधी ना कधी स्वप्न पडत असत. अश्यातच तुम्हाला तुमची जुनी शाळा दिसते, तुम्ही जुनी शाळा सोडून बरीच वर्षे उलटून गेलेली असतात. अशावेळी सकाळी उठल्यावर असे स्वप्न पडणे म्हणजे काय, याचा विचार येतो. आपण त्याबद्दल विचार करत राहतो पण अर्थ समजत नाही. तर हे स्वप्न तुम्हाला प्रत्येकवेळी काहींना काही संकेत देत असतात. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले व वाईट घडणार असल्याचं स्वप्न शास्त्रात म्हंटल आहे. स्वप्नशास्त्रात याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात शाळा पाहण्याचे रहस्य तरी काय आहे.

स्वप्नात शाळा दिसणे हे चांगले लक्षण आहे

स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात तुमची जुनी शाळा दिसली असेल तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ तुमची विद्वत्ता आणि ज्ञान वाढेल, ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल. यामुळे नजीकच्या भविष्यात तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी येऊ शकते. तसेच तुम्ही तुमच्या करिअरच्या यशाच्या शिखरावर पोहचू शकतात.

स्पर्धा परीक्षेत यश मिळेल

तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुमच्या स्वप्नात तुमची जुनी शाळा दिसत असेल तर हे तुमच्यासाठी चांगले लक्षण असू शकते. असे मानले जाते की अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की आता तुम्ही तुमच्या आयुष्यात यश प्राप्त करू शकतात आणि यश मिळविण्याची वेळ आली आहे. तर यात तुमच्या कामकाजात यश मिळाल्यानंतर मोठे स्थान प्राप्त कराल. नोकरीत वाढीसह पदोन्नतीही दर्शविली जाते.

तुमची मुले अभ्यासात उत्तम कामगिरी करतील!

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात शाळा पाहण्याचा एक अर्थ असा आहे की समाजात होणाऱ्या कार्यक्रमात तुम्ही बहुतेक निर्णय तुमच्या अनुभवाने आणि बुद्धीने घ्याल, ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. हे स्वप्न असेही सूचित करते की तुमची मुले अभ्यासात प्रगती करतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. यामुळे तुमचा धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.