पहिल्या नजरेतलं प्रेम खरंच असते का? डोक्यात नेमका काय होतो केमिकल लोचा ?
ऑक्सिटोसिन ज्याला 'लव्ह हार्मोन्स' असेही म्हटले जाते. मानवात भावनात्मक संबंध आणि सामाजिक संबंध वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरते. हे हार्मोन्स एखाद्या व्यक्तीला पाहून त्याच्याबद्दल प्रेम आणि विश्वास वाढविण्यास मदतगार ठरते. हे केवळ नात्यांना मजबूत बनवत नाही तर मेंदूला शांत आणि स्थिर करण्यासही मदत करते.

‘ती पाहतांच बाला, कलिजा खलास झाला, छातींत इष्कभाला, कीं आरपार गेला !’ असे आचार्य अत्रे यांचे एक गीत अजरामर आहे. परंतू पहिल्या नजरेतलं प्रेम खरोखरच असते का ? अनेक कविता, शेरो- शायरीत पहिल्या नजरेतल्या प्रेमाबद्दल लिहिलेले आहे. अखेर पहिल्या नजरेत कोणाला पाहून माणसाला प्रेम कसे काय होऊ शकते.? म्हणजे प्रेमाची सुरुवात डोळ्यापासूनच होते की काय ? काय आहे या मागचे विज्ञान हे आपण आज पाहूयात…. अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की जेव्हा आपण एखाद्याला पाहातो तेव्हा ती व्यक्ती पाहून शरीरातून ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. हे हार्मोन मानवी मेंदूत आणि शरीरात भावनात्मक आणि...