मायग्रेनच्या वेदना होत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या तज्ञांकडून

मायग्रेन ही एक तीव्र डोकेदुखी आहे. याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. मायग्रेनने ग्रस्त असलेले लोकं अनेकदा अशा चुका करतात ज्यामुळे समस्या आणखी गंभीर होते. तर अशावेळेस कोणत्या चुका करू नये ते जाणून घेऊयात.

मायग्रेनच्या वेदना होत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या तज्ञांकडून
migraine pain
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 4:02 PM

मायग्रेन म्हणजे डोक्याच्या अर्ध्या भागात होणारी तीव्र, मुंग्या आल्यासारखी वेदना जाणवते. ही वेदना इतकी त्रासदायक असते की ते काही तास जाणवते किंवा बरेच दिवसांपर्यंत सतावत असते. मायग्रेनवर अनेकदा उपचार केले जातात, परंतु जर एखाद्याला याचा त्रास झाला तर तो जास्त काळ टिकू शकतो. ही एक मज्जासंस्थेची स्थिती आहे, ज्यामुळे केवळ तीव्र डोकेदुखीच नाही, तर उलट्या, मळमळ आणि प्रखर प्रकाश व आवाजामुळे अस्वस्थता देखील जाणवते. या लक्षणांमध्ये डोळ्यासमोर प्रकाशझोत दिसणे किंवा अंधुक दिसणे, डोक्यात मुंग्या आल्यासारखे वाटणे आणि बोलण्यात अडचण येणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात.

या लेखात मायग्रेनचा त्रास झाल्यावर काही लोकं ज्या काही सामान्य चुका करतात त्या आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे ते तज्ञांकडून जाणून घेऊयात.

मायग्रेनची वेदना का होते?

संशोधनानुसार आपल्या मेंदूतील सेरोटोनिनच्या पातळीत घट झाल्यामुळे मज्जासंस्था अधिक संवेदनशील बनते. यामुळे अनेकदा डोकेदुखी सुरू होते. वाढलेला ताण, झोपेचा अभाव आणि हार्मोनल बदल हे मायग्रेनचे कारण ठरतात. मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये हार्मोनल बदल अधिक प्रमाणात दिसून येतात. याव्यतिरिक्त, प्रखर प्रकाश, मोठा आवाज, चॉकलेट आणि वाईनसारखे काही विशिष्ट खाद्यपदार्थ व पेयं आणि अयोग्य जीवनशैली यामुळे देखील मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

या चुकांमुळे मायग्रेनची वेदना वाढू शकते

पुरेशी झोप न मिळणे

तज्ञ सांगतात की मायग्रेनचा त्रास असलेल्या कोणत्याही व्यक्तीने पुरेशी झोप न घेण्याची चूक टाळावी. हे कधीतरी ठीक असू शकते परंतु जर ही सवय झाली तर मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. तज्ञांच्या मते पुरेशी झोप घेतल्याने मन शांत होते आणि शरीर आरामशीर होते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, खराब मानसिक आरोग्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अपुरी झोप. आजकाल लोक तासंतास फोन स्क्रीनकडे बघत बसतात, ज्यामुळे त्यांच्या झोपेचे चक्र बिघडते. तर आपण प्रत्येकांनी दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे.

मोठ्या आवाजांपासून दूर राहा

मायग्रेन असलेल्या लोकांना मोठ्या आवाजामुळेही हा त्रास होतो. मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने मायग्रेनचा त्रास सुरू होऊ शकतो. काही लोकं मोठ्या आवाजात संगीत ऐकतात आणि जर मायग्रेन असलेल्या व्यक्तीने असे केले तर कालांतराने त्यांना गंभीर समस्या जाणवू शकतात. ही मानसिक आरोग्य समस्या कमी करण्यासाठी शांत ठिकाणी वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो.

रिकाम्या पोटी राहणे

तज्ज्ञांच्या मते खाण्यापिण्यातील एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी किंवा अगदी सामान्य व्यक्तींनीही, जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे. आहार आणि फिटनेसच्या कारणांमुळे लोक आजकाल एकच टाईम जेवतात, यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते, ज्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तर नकारात्मक परिणाम होतोच, पण मानसिक आरोग्यही बिघडते. याव्यतिरिक्त मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त कॅफीन असलेले पदार्थ खाणे किंवा पिणे टाळावे, कारण त्यामुळे आपल्या झोपेच्या चक्रात अडथळा येतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us