AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omlette Recipe : पहिल्यांदा ऑमलेट कोणी बनवलं? तुम्हाला माहितीये का? नसेल तर हे नक्की वाचा…

जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही ऑमलेट तर नक्कीच खाल्ले असेल. खूप लवकर तयार होणारी ही रेसिपी बरेच जण पाव सोबत देखील खातात. एकतर ही रेसिपी बनवायला सोप्पी आहेच त्याबरोबर हेल्दी आणि चविष्ट आहे. म्हणूनच अनेकांना ऑमलेट खाण्यास खूप आवडते. मात्र तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा ऑमलेट कोणी बनवलं?

Omlette Recipe : पहिल्यांदा ऑमलेट कोणी बनवलं? तुम्हाला माहितीये का? नसेल तर हे नक्की वाचा...
omlet
Follow us
| Updated on: Mar 25, 2025 | 9:59 AM

अंड्यांपासून बनवलेली एक साधी पण चविष्ट रेसिपी म्हणजे ऑमलेट…  जगभरात ऑमलेट ही रेसिपी सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला तुमची भूक कमी वेळात भागवायची असेल आणि काहीतरी हेल्दी, चविष्ट खायचे असेल तर ऑमलेटशिवाय दुसरा कोणता बेस्ट ऑप्शन असूच शकत आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा ऑमलेट बनवण्याचा विचार आला असेल? किंवा पहिल्यांदा ऑमलेट कोणी बनवलं असेल? (Omelette Recipe History)

Omelette ला ऑमलेट हे नाव कसं पडलं?

ऑमलेट हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘Cuisine Bourgeoisie’ या फ्रेंच रेसिपी बुकमध्ये त्याची पहिल्यांदा नोंद करण्यात आली. ‘अल्युमेट’ हा शब्द १४ व्या शतकापासून वापरात होता. ही डिश फ्रान्सच्या आधी कुठेतरी नक्कीच अस्तित्वात असेल. कारण जेव्हा आपण त्याच्या इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला असे दिसते की ही डिश कोणत्याही एका ठिकाणाची किंवा काळाची निर्मिती नाही, तर ती वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तयार केली जाते.

अशी आहे ऑमलेट कथा…

ऑमलेटच्या इतिहासातील एक प्रसिद्ध कथा नेपोलियन बोनापार्टशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. नेपोलियन आणि त्याचे सैन्य एका शहरातून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना एका स्थानिक हॉटेलच्या मालकाने ऑमलेट खाण्यास दिले. नेपोलियनच्या तोंडात ती चव रेंगाळत राहिली. त्याला ते इतके आवडले की दुसऱ्या दिवशी त्याने शहरातून सर्व अंडी गोळा करून सैन्यासाठी एक मोठे आमलेट बनवण्याचा आदेश दिला असल्याचे सांगितले जाते.

आता ही कथा कितपत खरी किंवा खोटी हे माहिती नाही पण त्यानंतर, फ्रान्समधील बॅसियर्स शहरात दरवर्षी एक मोठं ऑमलेट तयार करण्याचा महोत्सव साजरा केला जाऊ लागला, ज्यामध्ये शेकडो अंड्यांपासून बनवलेले ऑमलेट संपूर्ण शहरातील लोकांना खाण्यास दिले जाते.

नेमका ऑमलेटचा शोध लावला तरी कोणी?

ऑमलेटचा शोध एका व्यक्तीने किंवा एका ठराविक ठिकाणाने लावला नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ऑमलेट हा पदार्थ तयार केला जात होता. कोणत्याही पदार्थाचे मूळ शोधणे साहाजिकच सोप्पं नसते, मात्र हे निश्चितपणे सांगता येईल की ऑमलेट हा पदार्थ जगाच्या प्रत्येक भागात आवडीने खाल्ला जातो. प्रत्येक ठिकाणी ऑमलेटला ऑमलेट हेच नाव नसेल पण रेसिपी मात्र सारखी असण्याची शक्यता आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....