Valentine’s Day 2023 | जगातील पहिले चुंबन कोणी घेतले आणि का ? कोणी सुरू केली चुंबन घेण्याची प्रथा

अतुल कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 1:36 PM

चुंबनाचा इतिहास आपल्याला रोमांचित करणारा आहे. पहिले चुंबन कोणी घेतले असावे याबाबत मानववंशशास्रज्ञ आणि तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. याबाबत वेगवेगळ्या थियरी सांगितल्या जात आहेत.

Valentine’s Day 2023 | जगातील पहिले चुंबन कोणी घेतले आणि का ? कोणी सुरू केली चुंबन घेण्याची प्रथा
ValentineSpecial,
Image Credit source: socialmedia

मुंबई :  कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेत राजस्थानात प्रवास करताना भाजपाच्या कार्यालय परीसरातून जाताना कार्यकर्त्यांच्या दिशेने एक ‘फ्लाईंग किस’ भिरकावला. यावरून खूपच चर्चा आणि काथ्याकुट झाला. आता ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्ताने या राजकीय चर्चेत जाता चुंबन या मानवी भावना व्यक्त करणाऱ्या प्रकाराची नेमकी सुरूवात कुठे झाली असावी यावर आपण बोलणार आहोत. प्रेम ही भावना व्यक्त करताना प्रियकराने प्रेयसीचे घेतलेले चुंबन असो वा आईने बाळाला घेतलेले चुंबन यात प्रेम हीच भावना कायम असते. या चुंबनाची सुरूवात कोणी केली हे जाणणे महत्वाचे आणि रंजक आहे. या चुंबनावर अनेक सरकारांनी बंदीही घातली आहे.

चुंबनाचा इतिहास आपल्याला रोमांचित करणारा आहे. पहिले चुंबन कोणी घेतले असावे याबाबत मानववंशशास्रज्ञ आणि तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. याबाबत वेगवेगळ्या थियरी सांगितल्या जात आहेत. एक गोष्ट मात्र खरी आहे की पहिले चुंबन एक अपघातच असावा ! असा अपघात जो हवाहवासा वाटला असावा !

असे म्हटले जाते की चुंबनाची सुरूवात आईने मुलाला घास भरविण्यापासून झाली असावी. आधीपासून प्राणी देखील आपल्या पिल्लांना जेवण भरवताना त्यांना घास त्यांच्या तोंडात भरवताना आपल्या तोंडाने चावलेला घास सरळ आपल्या तोंडाद्वारेच आपल्या पिल्लांना भरवायचे. याला प्रिमेस्टीकेशन फूड ट्रान्सफर म्हणतात. मानवी उत्क्रांती किंवा ह्युमन इवॉल्युशन असेच झाले असावे. चिंपाझी प्राण्यात अशा प्रकारे जेवण भरवले जाते. चिंपाझी माता आपल्या पिल्लांचे लाड करताना चुंबनही घेते. असेही असू शकते की आपण आपल्या पूर्वजांकडून म्हणजे या चिंपाझी पाहून चुंबन घेण्यास सुरूवात केली असावी.

दुसऱ्या थिअरीनूसार चुंबन निव्वळ एक अपघातच आहे. टेक्सास ए एंड एम यूनिवर्सिटीचे मानववंश शास्रज्ञ यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या मते मानवाने एकमेकांचा वास घेताना अचानक एकमेकांचे चुंबन घेतले असावे, येथूनच सुरूवात झाली असावी चुंबनाची ! या दाव्यात थोडा दम वाटतोय कारण की पूर्वीच्या काळात आपण प्राण्यांप्रमाणेच वर्तन करायाचो म्हणजे एकमेकांना भेटताना आपण कूत्र्यांसारखे एकमेकांचा वास घ्यायचो. अनेक संस्कृती असे एकमेकांना हुंगणे म्हणजे अभिवादनाचाच एक प्रकार होता. अशाप्रकारे हुंगतानाचे एखाद्या जोडीने एकमेकांचे चुंबन घेतले असावे. हे त्यातल्या त्यात सर्वाधिक तार्किक वाटते आहे.

असे म्हटले जाते चुंबनाची सुरूवात अशाच प्रकारे आपल्याच देशातून झाली असावी. नंतर प्राचीन ग्रीक आपल्या येथे आले आणि चुंबनाची कन्सेंप्ट तिकडे त्यांच्या देशात घेऊन गेले असावेत. आता भले चुंबनाला प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर भावना म्हटले जाते. तेव्हा असे नव्हते. कमीत कमी जुन्या काळात तरी असे नव्हते. मध्य काळात युरोप मध्ये याला ग्रीटींग वा सदिच्छा म्हणूनच पाहीले जायचे. जे कनिष्ट वर्गाचे लोक उच्च वर्गाच्या लोकांसाठी करायचे. दोन समान दर्जाचे लोक एकमेकांना भेटताना एकमेकांच्या कपाळाला किंवा ओठांना चुंबन घ्यायचे. तर केवळ कनिष्ट वर्गाचा व्यक्तीच उच्च व्यक्तीच्या हाथाचे, पायाचे किंवा कपड्याच्या कोपऱ्याचे चुंबन घ्यायचा.

यानंतर चुंबनाचा प्रकार आणि रूप आणखीन खोलवर गेले. त्या अधिक आवेग आला. विशेषतः ओठांवरचे चुंबन प्रेमाचे प्रतीक बनू लागले. तसेच सध्या चुंबनाच्या खास प्रकारावर फ्रान्सने आपली मोहर उमटवली आहे तो फ्रेंच किसची सुरूवात कोणा फ्रेंच जोडप्यानेच केली असावी, यावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र फ्रान्सचाच दावा तगडा आहे.

सुमारे दशकभरापूर्वी फ्रान्सनेच चुंबनाला आपल्या डिक्शनरीत समाविष्ट करीत त्याचे नामकरण केले, गलॉश असे त्याला नाव दिले गेले. आणि असा दावाही केला की पहिल्या जागतिक महायुद्धा दरम्यान फ्रान्समध्ये राहिलेल्या अमेरीकन सैनिकांनी हे रहस्य जाणून त्याचा सगळीकडे प्रसार केला. पश्चिमेकडील अनेक देश फ्रेंच किसवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक मानववंश शास्रज्ञ वेगवेगळे दावे करीत आहेत.

रोमन शासक टायबेरीअस याने ओठांच्या चुंबनावर बंदी घातली होती. कारण याद्वारे आजार पसरण्याचा धोका होता. त्याचे साम्राज्य खूप दूरपर्यत पसरलेले होते. इजिप्त पासून इटली- जर्मनी आणि बेल्जियम – स्वित्झलँडचा मोठा हिस्सा त्याच्या ताब्यात होता. या सर्व प्रातांत चुंबनावर बंदी होती. येथूनच मग गालांचे चुंबन घेण्याची प्रथा सुरू झाली. जे आता पाश्चात्य देशांसह आपल्या येथेही चांगलेच प्रचलित आहे. 17 व्या शतकात प्लेगने थैमान घातले होते. त्यामुळे ब्रिटनसह अनेक देशांनी चुंबनावर कायद्याने बंदी घातली. याचे पालन न करणाऱ्या जबर दंड होता. अमेरीका जो आता खुलेपणा आणि स्वातंत्र्यासाठी ओळखला जातो त्याने सार्वजनिक ठिकाणी चुंबने घेणे हे शिष्टाचाराला धरून नसल्याचे म्हटले. पहिल्या जागतिक युद्धापूर्वीची ही बाब आहे. तत्कालिन अमेरीकन राष्ट्राध्यक्ष केल्वीन कूलीज यांनी चुंबनाला वाईट गोष्ट मानले. शिष्टाचाराच्या पुस्तकात एमिली पोस्ट यांनी याला स्थान दिले होते. साल 1925 पासून अनेक वर्षे चुंबनावर बंदीच होती.

चुंबनाचा विचार करताच अनेकांच्या मनात कोणती ना कोणती रोमॅंटीक भावना जागृत होते, परंतू ते इतके रोमांटीक नाही, जेवढे आपण मानतोय जगातील ५४ टक्के लोकसंख्या तर असेच मानते. अमेरीकन मानववंश शास्रज्ञांनी जगातील वेगवेगळ्या भागातील १६८ संस्कृतींचा अभ्यास केला. त्यातील ४६ टक्के लोक चुंबनाला रोमान्सशी जोडतात. विशेषत : ओठांना चुंबन घेणे त्यांना रोमान्स वाटतो. बाकीच्यांनी त्यास महत्व दिले नाही. जगातील अनेक भागात आता चुंबनाला वाईट मानले जात आहे. सोमालिया देशात यास आजार पसरवणारा प्रकार मानला जातो. बोलिवीयाचा सिरिओना जाती किसिंगपासून लांब आहेत. कदाचित एकमेकांना समजण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी या जाती आजही एकमेकांना हुंगत असतील !

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI