विमान टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी एअर होस्टेस पायाखाली हात दाबून का बसतात?
विमान उड्डाण करताना आणि लॅंडींग करताना एअर होस्टेस नेहमी पायाखाली हात दाबून का बसतात. हे आपण सर्वांनीच पाहिलं असेल. विमान उड्डाण करताना आणि लॅंडींग करताना प्रवाशांना ही सुचना का दिली जात नाही.यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात.

विमान प्रवासाबद्दची अनेक माहिती आतापर्यंत आपण वाचली असेल. विमान प्रवासाबाबतच्या अनेक रंजक गोष्टी आहेत. यातील काही गोष्टींची चर्चा होते तर काहींची नाही. त्यामुळे अनेक सत्य असे आहेत जे प्रवाशांना माहितच नसतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान, एअर होस्टेस त्यांचे हात पायाखाली दाबून का बसतात?
एअर होस्टेस स्वत: हा हात पायाखाली दाबून बसतात पण प्रवाशांना त्याची आवश्यकता का नसते ?
विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान एअर होस्टेस प्रवाशांना सीटबेल्ट लावण्यास सांगतात आणि त्यांना जागेवरून उठण्यासही मनाई करतात. आणि सर्व क्रू मेंबरसह त्याही सीटवर जाऊन बसतात. पण त्याचसोबत त्या आपले हात म्हणजे तळवे पायाखाली दाबून बसतात. तुम्हीही हे प्रत्यक्षात विमान प्रवासात पाहिलं असेल किंवा चित्रपटांमध्येही पाहिलं असेल. पण असं काय कारण आहे की एअर होस्टेस स्वत: हा हात पायाखाली दाबून बसतात पण प्रवाशांना त्याची आवश्यकता नसते.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान, एअर होस्टेस तिच्या सीटवर बसते आणि तिचे हात पायाखाली दाबते. हा एक अतिशय सामान्य प्रोटोकॉल आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का केले जातं? चला जाणून घेऊया यामागे नेमकं काय कारण आहे ते.
सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन
विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग हे सर्वात महत्वाचे आणि संवेदनशील टप्पे आहेत. या काळात कोणताही निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच, एअर होस्टेसना या काळात त्यांच्या सीटवर बसून सीट बेल्ट लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतात. पायाखाली हात ठेवण्याचे पहिले कारण म्हणजे विमानात अचानक धक्का बसला किंवा कोणतीही घटना घडली तर त्या संतुलन बिघडू नये. स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील म्हणून.
शरीराचा संतोल सांभाळणे
लँडिंगनंतर देखील विमानाचा वेग हा जास्त असतो. ज्यामुळे शरीरावर दबाव येतो. जर एअर होस्टेसने त्यांचे हात पायाखाली ठेवल नाहीत तर त्या अचानक पुढे पडू शकतात. हात पायाखाली ठेवल्याने शरीर संतुलित राहते आणि त्यांना सीटवर बसण्यासाठी लागणारा तेवढा दबाव व्यवस्थित मिळतो.
आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहणे
टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, एअर होस्टेसने प्रवाशांना तात्काळ मदत करण्यासाठी तयार असले पाहिजे. पायाखाली हात ठेवून बसून, त्या लवकर उठूही शकतात. ही स्थिती त्यांना स्थिर राहण्यास मदत करते, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीला त्वरित सामोरे जाऊ शकतात. किंवा अलर्ट राहू शकतात.
विमान प्रवासाचे नियम म्हणून
प्रत्येक एअरलाइन्सचे स्वतःचे सुरक्षा प्रोटोकॉल असतात, जे एअर होस्टेसना पाळणे बंधनकारक असते. या नियमांनुसार, त्यांना टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान त्यांच्या सीटवर बसावे लागते आणि त्यांचे हात पायाखाली ठेवावे लागतात
शारीरिक सुरक्षितता आणि आराम
एअर होस्टेसना बराच वेळ उभे राहिल्यानंतर पाय दुखू शकतात किंवा थकवा येऊ शकतो. पायाखाली हात ठेवून बसल्याने त्यांच्या शरीराला आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
विमान उड्डाण आणि उतरताना एअर होस्टेसना पायाखाली हात ठेवून बसण्याची पद्धत केवळ नियम नाही तर ती सुरक्षितता आणि व्यवहारिकतेवर आधारित आहे. यामुळे प्रवाशांची तसेच त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होते आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करण्यास मदत होते.
