AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोतापुरी आंबा का ठरला प्रचंड लोकप्रिय? जाणून घ्या नावामागचं कारण

तोतायाच्या चोचीसारखा आकार, गोडसर-आंबट चव आणि विटॅमिन्सने भरलेला तोतापरी आंबा नेमका इतका लोकप्रिय का आहे? आणि त्याला 'तोतापरी' हे नाव कसं पडलं याची माहिती तुम्हालाही नसेल! जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

तोतापुरी आंबा का ठरला प्रचंड लोकप्रिय? जाणून घ्या नावामागचं कारण
Totapuri MangoImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jun 17, 2025 | 3:32 PM
Share

उन्हाळा आला की आंब्याचा हंगाम सुरू होतो. फळांचा राजा असलेला आंबा संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. आपल्या भारतात हजारो प्रकारचे आंबे आढळतात आणि या सर्वात एक विशेष प्रकार म्हणजे तोतापरी आंबा. याचे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की याला ‘तोतापुरी’ असे का म्हणतात? चला यामागचं रहस्य जाणून घेऊया.

‘तोतापुरी’ नावामागचं कारण

या आंब्याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. त्यामुळेच याला ‘तोतापुरी’ हे नाव दिलं गेलं. तसेच काहींच्या मते हा आंबा किंचित आंबटसर असल्यामुळे पोपट देखील याला फार पसंती देतात, म्हणूनच ‘तोता प्रिय’ आणि नंतर ‘तोतापुरी’ असं नाव पडल्याचं सांगितलं जातं.

बिहारमध्ये वाढत आहे तोतापुरी आंब्याची मागणी

बिहारमध्ये अजून स्थानिक आंब्यांची (मालदह प्रकाराची) गाठ तयार होत असतानाही बाजारात तोतापुरी आंब्याची विक्री जोरात सुरू झाली आहे. सध्या हा आंबा बिहारमध्ये ₹150 ते ₹200 प्रति किलो दराने विकला जात आहे. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

तोतापुरी आंब्याची वैशिष्ट्ये

तोतापुरी आंबा इतर आंब्यांपेक्षा थोडा वेगळा असतो. हे आंबे पिकल्यावरही हिरवट रंगाचेच राहतात, फक्त त्यावर थोडे पिवळसर छटा दिसतात. यांचा आकार देखील तोतयाच्या चोचीप्रमाणे निमुळता असतो. गोडसर रसदारपणा कमी असला तरी याची चव विशेष असते. कमी आंबट गोड चव असल्याने अनेकांना याचा लोणच्यासाठी, कोशिंबिरीत किंवा चटणीसाठी वापर करायला फार आवडतो.

यात विटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही हे फायदेशीर ठरतात. पचनक्रिया सुधारण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात याचा उपयोग होतो.

कुठे होते उत्पादन?

तोतापुरी आंब्याची प्रमुख लागवड कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. याचा गोडसर-आंबट स्वाद आणि जाडसर साल याला ओळख देतात. आतला गर पिवळसर नारिंगी रंगाचा असतो.

बिहारात मालदह आंब्याची तयारी सुरू

बिहारमध्ये मालदह हा प्रमुख आणि लोकप्रिय आंबा लवकरच बाजारात येईल. सध्या मात्र दशहरी, कलमी आणि इतर काही प्रकारांचे आंबे मिळत आहेत. मात्र ग्राहकांना त्यांच्यात तो खरा स्वाद मिळत नसल्याने मागणी कमी आहे. मालदह आंबा बाजारात आल्यानंतर मात्र आवक वाढून दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

फळांचा राजा आणि तोतापुरीची खास ओळख

आंबा हा वर्षभर सहज मिळत नसला तरी उन्हाळा सुरू होताच बाजारात विविध प्रकारचे आंबे येऊ लागतात. त्यातील रस, गोडी आणि विविध प्रकारांमुळे आंब्याची मागणी कायमच उच्च असते. तोतापुरी आंबाही त्याच्या खास वैशिष्ट्यांमुळे देशात आणि परदेशात लोकप्रिय झाला आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.