AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याला अंधारात ठेवून स्त्रियांनी हे काम करावं; सुधा मूर्ती यांचा सल्ला काय?

Relationship Tips For Wife : सुधा मूर्ती या नेहमी रिलेशनशिपबद्दल टिप्स शेअर करत असतात. त्यांच्या विचारांचे पालन करून तुम्ही तुमचे नाते घट्ट करू शकता आणि नात्यात तुमची ओळखही टिकवू शकता.

नवऱ्याला अंधारात ठेवून स्त्रियांनी हे काम करावं; सुधा मूर्ती यांचा सल्ला काय?
| Updated on: Jul 09, 2024 | 2:07 PM
Share

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांची नवी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेकवेळा ते लोकांशी संवाद साधत, अनुभव शेअर करत असतात. सुधा मूर्ती यांचे लेखन सर्वांनाच परिचित आहे. इन्फोसिस कंपनी सुरू करणारे नारायण मूर्ती यांना त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांची भक्कम साथ मिळाली, म्हणूनच ते एवढा मोठा पल्ला गाठू शकले. ही आयटी कंपनी भारतात आणण्याचे जेवढे श्रेय नारायण मूर्ती यांना दिले जाते तेवढेच श्रेय त्यांची पत्नी, सुधा मूर्ती यांनाही आहे.

असं का व्हावं ? याचं उत्तर सुधा मूर्ती यांनी स्वतः दिले होते. काही काळापूर्वी त्या कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांचे पती कंपनी सुरू करण्याचा विचार करत होते, तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यानंतर सुधा मूर्ती यांनी त्यांना घरखर्चातून वाचवलेल्या पैशातून मदत केली.

पतीला न सांगता करा पैशांची बचत

तो अनुभव शेअर करताना सुधा मूर्ती यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या महिलांना एक सल्ला दिला. प्रत्येक महिलेने आपल्या पतीपासून लपवून किंवा पतीला न सांगता पैशांची बचत करावी असे आवाहन सुधा मूर्ती यांनी केले.

लपवून बचत करणं गरजेचं का ?

लपवून बचत करणं गरजेचं का असतं यावर त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, तुम्ही तुमच्या बचतीबद्दल कोणालाही सांगू नका. असं केलं तर ते पैसे लवकर खर्च होण्याची शक्यता असते. विशेषत: जेव्हा पुरुषांना माहित असते की घरात पैसा आहे, तेव्हा ते खर्च करण्यासाठी खूप उत्सुक असतात.

पतीला साथ देऊ शकाल

पुढे बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, आपल्या पतीला आर्थिक मदत करण्यासाठी प्रत्येक महिलेने नोकरीच केली पाहिजे, असं काही आवश्यक नाही. ज्या स्त्रिया घरी आहेत, त्याही आपल्या बुद्धीचा वापर करून घर चालवण्यासाठी दिलेले पैसे वाचवू शकतात. आणि गरज पडल्यास या पैशातून त्या आपल्या पतीला आधार देऊ शकतात.

पतीच्या मनात आदर वाढतो

कमी उत्पन्न असतानाही पैसे वाचवण्याचे कौशल्य केवळ कुशल स्त्रीकडेच असते. अशा महिलांना त्यांच्या पतीकडून खूप आदर मिळतो, असे त्यांनी नमूद केले,

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ