वाढत्या उकाड्यामुळे मलेरिया-डेंग्यूचे डास वाढतील की नाहीसे होतील? नवा रिसर्च काय सांगतो ?

ताज्या संशोधनानुसार, वाढत्या तापमानामुळे आणि हीटवेव्हमुळे सर्वत्र आजार वाढतातच असं नाही. काही भागांमध्ये उष्णतेमुळे संसर्गजन्य जंतू नष्ट होतात, तर काही ठिकाणी ते वाढतात. त्यामुळे नेमकी उष्णता वाढल्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी सविस्तर माहिती वाचा.

वाढत्या उकाड्यामुळे मलेरिया-डेंग्यूचे डास वाढतील की नाहीसे होतील? नवा रिसर्च काय सांगतो ?
malaria
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 10:00 PM

जगभरात वाढणारे तापमान आणि वाढती हीटवेव्ह (उष्णतेची लाट) यामुळे फक्त पर्यावरणातच नाही, तर माणसाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. मात्र अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसर्चनुसार, तीव्र उष्णतेमुळे काही संसर्गजन्य आजार वाढण्याऐवजी कमी होण्याचीही शक्यता असते. म्हणजे, तापमान वाढल्यावर सगळीकडे आजार वाढतीलच असं नाही; काही ठिकाणी ते उलटही घडू शकतं.

शोधकांनी लक्षात घेतलं की, उष्णतेचा परिणाम वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा होतो. काही भागांमध्ये जास्त उष्णतेमुळे पॅरासाइट्स (जंतू) अधिक वाढतात, तर काही ठिकाणी हीटवेव्हमुळे ते मरून जातात. याचा थेट संबंध त्या भागातील तापमान, आर्द्रता आणि हीटवेव्ह किती काळ टिकते यावर असतो.

हीटवेव्हचा आजारांवर काय परिणाम?

उदाहरणार्थ, डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा फैलाव पाण्यात अंडी घालणाऱ्या डासांमुळे होतो. उष्णतेने अशा डासांच्या वाढीवर कसा परिणाम होतो, हे त्या परिसरातील तापमानानुसार बदलते. खूप गरम वातावरणात डासांचे अंडे मरू शकते, तर सौम्य उष्णतेत त्यांची संख्या वाढते.

उपचार पद्धतीमध्ये होणार बदल

या रिसर्चमधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे “वन साईज फिट्स ऑल” पद्धतीने उपचार करता येणार नाहीत. म्हणजेच एकाच उपाययोजना सर्व भागांसाठी लागू न करता, स्थानिक हवामान आणि डेटा लक्षात घेऊन ‘हायपर-लोकल’ म्हणजे अत्यंत स्थानिक पातळीवरची आरोग्यदृष्टी विकसित करावी लागेल.

शोधाचे निष्कर्ष काय सांगतात?

  • उष्णतेचा आजारांवर परिणाम स्थानिक वातावरणावर अवलंबून असतो. हीटवेव्ह काही भागांत संसर्गजन्य आजारांना आळा घालू शकते.
  • तर काही भागांमध्ये तेच आजार आणखी गंभीर रूप धारण करू शकतात.
  • यामुळे आरोग्य व्यवस्थांना तापमान, आर्द्रता आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून रणनीती आखावी लागेल.

तर आपण काय शिकायला हवे?

सध्या चालू असलेल्या हवामान बदलाच्या काळात सार्वजनिक आरोग्यविषयक योजना आखताना केवळ सरसकट धोरण न घेता, विज्ञानावर आधारित, जागोजागी विशिष्ट अशा धोरणांचा अवलंब करावा लागेल. भविष्यात आरोग्य धोरण ‘हायपर-लोकल डेटा’वर आधारित असावं लागेल हे स्पष्टपणे या संशोधनातून समोर येत आहे.

तुमचा दैनंदिन दिनक्रम कसा असावा?

सध्या उन्हाचा तापमान दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन दिनक्रम आरोग्यदायी आणि संतुलित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

  • दिवसाची सुरुवात सकाळच्या थंड वातावरणात हलक्याफुलक्या व्यायामाने किंवा योगासने करून करावी.
  • यानंतर हलकं आणि पौष्टिक न्याहारी घ्यावी, ज्यामध्ये फळं, दूध किंवा दलिया असावा.
  • दिवसभर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही.
  • दुपारी शक्यतो घरात राहून उन्हापासून संरक्षण करावं, उन्हात जाणं टाळता आलं तर उत्तमच.
  • जेवणात जड, तेलकट पदार्थांऐवजी हलकी व पचायला सोपी आहारपद्धती अवलंबावी.
  • दुपारी थोडी विश्रांती घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
  • संध्याकाळी सूर्यास्तानंतरच बाहेर पडावं आणि हलका चालण्याचा व्यायाम करावा.
  • रात्री लवकर झोपावं, जेणेकरून शरीराला योग्य विश्रांती मिळेल आणि दुसऱ्या दिवशी ऊर्जा मिळेल.
  • या दिवसांत शांत, संयमित आणि आरोग्यदायी दिनक्रमच तुमचं आरोग्य टिकवून ठेवू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)