Winter Care | हिवाळ्यात ‘ही’ पेय ठेवतील शरीराला आतून उबदार, वाचा यांची वैशिष्ट्ये…

Winter Care | हिवाळ्यात ‘ही’ पेय ठेवतील शरीराला आतून उबदार, वाचा यांची वैशिष्ट्ये...

आपले शरीर उबदार राहावे, तसेच शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत व्हावी, यासाठी आयुर्वेदिक, घरगुती पेयांचा शोध लोक घेत असतात.

Harshada Bhirvandekar

|

Jan 20, 2021 | 3:51 PM

मुंबई : सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. थंडीचा कडका देखील यंदा बराच वाढला आहे. अशावेळी या बोचऱ्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि आपले शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी लोक नवीन मार्ग शोधत आहेत. आपले शरीर उबदार राहावे, तसेच शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत व्हावी, यासाठी आयुर्वेदिक, घरगुती पेयांचा शोध लोक घेत असतात. असे अनेक घरगुती काढे आरोग्यासाठी बऱ्याचदा लाभदायी ठरू शकतात (Winter care immunity booster health drinks).

या कडाक्याच्या जर आपण देखील अशा पेयांचा शोध घेत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती पेयांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या शरीरासाठी खूप लाभदायी ठरतील…

टोमॅटो सूप

टोमॅटोची गणना नेहमीच स्वादिष्ट भाज्यांमध्ये केली जाते. टोमॅटो स्वादिष्ट असण्याबरोबरच आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि सोडियम, सल्फर, जस्त, पोटॅशियम यासारखी खनिज घटक देखील आढळतात असतात. टोमॅटो सूपमध्ये हलके तळलेले ब्राऊन ब्रेडचे तुकदे टाकून, तुम्ही या सूपची चव आणखी वाढवू शकता. टोमॅटो सूप आपल्या शरीरास आतून उबदार ठेवते. तसेच वजन कमी करून, हृदय निरोगी ठेवण्याचे काम देखील करते (Winter care immunity booster health drinks).

आल्याचा चहा

आयुर्वेदात आल्याचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. शतकानुशतके आल्याच्या चहाचे सेवन केले जात आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत. आल्यामध्ये आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो आणि आपल्या पाचक समस्यांना प्रतिबंधित करतो. आपणास गोड चहा हवा असल्यास या आल्याच्या चहामध्ये थोडेस मध देखील घालू शकता. यामुळे चहाची चव थोडी गोड होईल आणि आल्याच्या चहाचा स्वाददेखील वाढेल.

हळदीचे दूध

इंग्रजीत ‘गोल्डन मिल्क’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे पेय मराठीमध्ये ‘हळदीचे दूध’ म्हणून ओळखले जाते. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. या पिवळ्या दुधामध्ये दालचिनी, आले आणि मिरपूड यासारख्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांची पूड देखील टाकली जाते. यात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे आपल्याला हंगामी सर्दीपासून दूर ठेवतात आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत करतात.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.) 

(Winter care immunity booster health drinks)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें