गुलाबी थंडीत राजस्थानमधील ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

गुलाबी थंडीत फिरण्याची किंवा ट्रॅव्हल्सची मजा काही वेगळीच आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेकजण फिरण्याचा प्लॅन आखतात. अर्थातच त्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन्स कोणते याची चर्चा सुरु होते. आज आम्ही तुम्हाला असेच काही खास डेस्टिनेशन्स सांगणार आहोत. जाणून घ्या

गुलाबी थंडीत राजस्थानमधील ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट
राजस्थानमधील ‘या’ सुंदर ठिकाणांना भेट द्या
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 4:41 PM

गुलाबी थंडी म्हणलं की पहिलं डेस्टिनेशन समोर येतं ते म्हणजे राजस्थान. थंडीच्या दिवसात राजस्थानमध्ये फिरण्याची मजाच काही वेगळी आहे. येथे अनेक सुंदर आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. ही तुम्ही पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येतात. त्यामुळे यंदा हा प्लॅन तुम्हाला आखता येऊ शकतो.

राजस्थानमधील उदयपूरच्या तलावांपासून, जयपूरच्या भव्य हवेलींपासून ते जैसलमेरच्या वाळूच्या ढिगाऱ्यापर्यंत अनेक प्रेक्षणीय स्थळे येथे पाहायला मिळतात. जाणून घेऊया थंडीच्या हंगामात राजस्थान कुठे फिरता येईल, याविषयी विस्ताराने.

राजस्थान आपल्या भव्य स्थापत्य आणि शाही वारशासाठी प्रसिद्ध आहे. येथे आपण अनेक ऐतिहासिक राजवाडे आणि सुंदर ठिकाणे शोधू शकता. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हवामान येथे फिरण्यासाठी योग्य असते. चला तर मग जाणून घेऊया या सीझनमध्ये तुम्ही राजस्थानमध्ये कोणती ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

जयपूर

जयपूरला पिंक सिटी असंही म्हणतात, हे तुम्हाला माहितीच असेल. पिंक सिटीसह अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे देश-विदेशातील लोक दर्शनासाठी येतात. तुम्ही आमेर किल्ला, हवा महल, जंतरमंतर, गलताजी मंदिर, नाहरगड किल्ला, जल महल, जयगड किल्ला, सिटी पॅलेस, रामबाग पॅलेस, पन्ना मीना का कुंड, गातोर, विद्याधर उद्यान, अनोखी म्युझियम ऑफ हँड प्रिंटिंग, राम निवास उद्यान, कनक वृंदावन, ईश्वर लाट, महाराणी की छत्री, सांभर तलाव, सोमेड महल आणि हथिनी कुंड पाहू शकता. याशिवाय पिंक सिटी मार्केटमध्ये जाऊन तुम्ही शॉपिंगला जाऊ शकता.

उदयपूर

उदयपूरला तलावांचं शहर म्हटलं जातं. अरावलीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या या शहराचे नैसर्गिक सौंदर्य अतिशय आकर्षक आहे. तुम्हाला इथं जोडीदारासोबत बोटीवर बसून आनंद घेता येईल.

तुम्ही लेक पॅलेस, उदयपूर सिटी पॅलेस, जय मंदिर, सज्जनगड मॉन्सून पॅलेस, फतेहसागर तलाव, पिछोला तलाव, सहेलियन की बारी, दूध तलाई तलाव, जयसमंद तलाव, बागोरे की हवेली आणि उदयपूरच्या अनेक बाजारपेठांना भेट देऊन खरेदी करू शकता.

माउंट आबू

राजस्थानमधील माऊंट आबूलाही तुम्ही भेट देऊ शकता. येथे तुम्ही लेक, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, तोड रॉक, अचलगड किल्ला, पीस पार्क, ट्रॅव्हलर्स टँक, हनीमून पॉईंट आणि सनसेट पॉईंट अशी ठिकाणे पाहू शकता.

तुम्ही श्री रघुनाथ मंदिर, आधार देवी मंदिर आणि गौमुख मंदिराला भेट देऊ शकता. माऊंट आबू मार्केट आणि तिबेटियन मार्केटला खरेदीसाठी भेट देता येते.

जैसलमेर

किल्ले आणि हवेलींचे शहर जैसलमेरलाही तुम्ही भेट देऊ शकता. जैसलमेर किल्ला, सॅम सॅंड टीन, डेझर्ट नॅशनल पार्क, गदिसर तलाव, सलीम सिंगची हवेली, पटों की हवेली, व्यास छत्री, सॅम सॅंड टीन्स आणि गादी सागर तलाव अशा ठिकाणांना भेट देता येईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.