AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पहिल्यांदा योगा करताय का? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या

नवीन वर्षाचे अनेकांनी नवनवे संकल्प केले असतील. नवीन वर्षात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेकजण योगाभ्यास करण्याचा संकल्प करतात. अशावेळी जर तुम्ही पहिल्यांदाच योगा सुरू करणार असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टींची काळजी घ्या.

तुम्ही पहिल्यांदा योगा करताय का? तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 7:38 PM
Share

तुम्ही पहिल्यांदाच योगा सुरू करणार असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टींची काळजी घ्या. कारण, झालेल्या चुकीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही यावर्षी योगासने सुरू करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. जाणून घेऊया.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फिट राहण्यासाठी अनेक जण नववर्षाचे संकल्प करतात. यासाठी अनेक जण जिम जॉईन करण्याचा विचार करतात, तर अनेक जण घरीच योगा करण्याचा विचार करतात. योगामुळे शरीरात लवचिकता येते आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. योगाच्या सुरुवातीला प्रत्येक व्यक्तीने अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या दरम्यान झालेल्या चुकीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही यावर्षी योगासने सुरू करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

रिकाम्या पोटी योगा करावा

योगतज्ज्ञ डॉ. संपूर्णा म्हणाल्या की, रिकाम्या पोटी योगा करावा. यासाठी योगा करण्यापूर्वी अर्धा तास आधी किंवा पोट रिकामे करण्यासाठी पाणी प्यावे. जर तुम्ही सकाळी योगा करत नसाल तर लक्षात ठेवा की जेवण केल्यानंतर कमीत कमी 3 तासांनी योगा करावा. जर तुम्ही ब्रेकफास्टनंतर योगाभ्यास करत असाल तर कमीत कमी 2 तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.

योगा मॅट

योगा करताना मॅटची काळजी घ्यावी. कारण योगा मॅट कम्फर्टेबल नसेल तर योगा करताना त्रास होऊ शकतो. स्लाइडिंग मॅट नसावे. कारण योगादरम्यान घसरून दुखापत होऊ शकते. त्याचबरोबर मॅटच्या स्वच्छतेची ही काळजी घ्या.

कपड्यांची निवड

योगासाठी योग्य कपडे निवडणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आरामदायी कपडे, विशेषत: इनर वेअर निवडा जेणेकरून तुम्हाला अस्वस्थ वाटणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित श्वास घेऊ शकाल. तसेच हवामानानुसार तुम्ही सहज योगा करू शकाल असे कपडे निवडा.

योग्य योगासन

योगा करताना योग्य आसन आणि श्वासोच्छवासाचे योग्य तंत्र लक्षात ठेवा. हे सर्वात महत्वाचे आहे. योगाचे तंत्र चुकीचे असेल तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. कोणते योगासन करायचे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच जर तुम्ही शरीरातील वेदना किंवा आजारापासून आराम मिळवण्यासाठी योगा करत असाल तर तज्ज्ञांशी बोलून योग्य योगासन करा कारण चुकीचे योगासन निवडल्याने समस्या वाढू शकते. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योगासने सुरू केल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

खुल्या हवेत योगा केल्यास फायदेशीर

खुल्या हवेत योगा केल्यास ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे शरीराला योग्य ऑक्सिजन मिळेल. पण प्रदूषणाची पातळी जास्त असेल तर घरीच योगा करावा.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.