वाढत्या वयानुसार तुमचा चेहरा उजळेल, फक्त स्वंयपाकघरातील ‘या’ चार गोष्टीपासून घरीच बनवा बोटॉक्स जेल
वाढत्या वयानुसार जर तुमच्या त्वचेचा रंग कमी होत चालेला आहे, यासाठी अनेक उपाय करताय तर आजच्या लेखात आपण नैसर्गिकरित्या चेहरा उजळ करण्यासाठी स्वंयपाकघरातील या काही गोष्टींचा वापर करून घरगूती पद्धतीने बोटॉक्स जेल कशी बनवायची तसेच त्यांचे त्वचेला होणारे फायदे याबद्दल जाणून घेऊयात.

आजकाल प्रत्येकाला त्वचेच्या समस्या सतावत असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण घरगुती तसेच नैसर्गिक उपाय करण्याकडे वळत आहेत. कारण घरगुती उपायांमुळे त्वचेला कोणतेच दुष्परिणाम होत नाही. अशातच तुम्हालाही वाढत्या वयानुसार चेहऱ्याचा रंग कमी झालेला वाटत असेल आणि त्याकरिता तुम्ही अनेक स्किन केअर उपाय करताय तर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर आपण त्वचेसाठी करू शकतो. तुम्ही फक्त या चार घटकांचा वापर करून घरीच बोटॉक्स जेल बनू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे मिळतील, जसे की त्वचा घट्ट होणे, बारीक रेषा कमी होणे आणि नैसर्गिक चमक वाढणे. चला तर मग आजच्या लेखात आपण हे जेल कसे बनवू शकतो ते जाणून घेऊयात.
आजकाल बोटॉक्स ही कॉस्मेटिक ट्रीटमेंट ट्रेंडिंग आहे. यामध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पोषक तत्वे इंजेक्ट केली जातात. यामुळे डोळ्यांच्या कडेच्या सुरकुत्यांपासून ते कपाळापर्यंतच्या सुरकुत्या कमी होतात. सध्या तुम्ही या प्रक्रियेऐवजी बोटॉक्स जेल वापरू शकता आणि विशेष म्हणजे ते घरीच बनवता येते.
बोटॉक्स जेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बोटॉक्स ग्लो जेल बनवण्यासाठी तुम्हाला चार गोष्टींची आवश्यकता आहे. 8 ते 10 लवंगा यासोबतच तुम्हाला काही तमालपत्र(तेजपत्ता), शुद्ध बदामाचे तेल आणि ताज्या कोरफडीचा गर लागेल.
या पद्धतीने बनवा बोटॉक्स जेल
लवंग आणि तमालपत्र ग्राइंडरमध्ये टाका आणि त्याची बारीक पूड करा.
150 मिली आरओ पाणी किंवा मिनरल वॉटर घ्या आणि त्यात लवंग आणि तमालपत्र टाकून चांगला रंग येईपर्यंत उकळवा.
आता यातील थोडे पाणी एका वाटीत किंवा बरणीत ओता. तुम्ही प्रत्यक्षात एक जेल बनवत आहात, म्हणून जास्त पाणी वापरू नका.
या पाण्यात ताज्या कोरफडीचा गर चांगले मिक्स करा. नंतर बदामाचे तेल मिक्स करा.
लक्षात ठेवा की तुम्हाला घट्टपणानुसार 1 ते 1.5 चमचा बदामाचे तेल आणि कोरफडीचा गर मिक्स करावा लागेल.
काही मिनिटांत तयार केलेला हा जेल हवाबंद बरणी किंवा बाटलीत साठवून ठेवा.
हे जेल कसे लावावे?
या जेलचा थोडासाच भाग पुरेसा आहे. दररोज रात्री चेहरा धुतल्यानंतर या जेलचे काही थेंब चेहऱ्यावर लावा आणि 30 ते 50 सेकंद हलक्या हाताने मसाज करा.
घरगूती बोटॉक्स जेल चेहऱ्याला लावण्याचे फायदे
हे जेल तुमची त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट बनवण्यास मदत करेल.
रोजच्या वापराने चेहऱ्यावरील बारीक रेषा हळूहळू कमी होतात आणि चमक वाढते.
हे जेल लावल्याने त्वचेला आराम मिळतो, ज्यामुळे सूज कमी होते.
बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते, जे त्वचेचे खोलवर पोषण करून तिला निरोगी बनवते.
रात्रभर हे जेल लावल्यानंतर सकाळी तुमची त्वचा ताजीतवानी दिसेल कारण ते थकलेल्या त्वचेला आराम देते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)