पाळीव कुत्रा तुमच्याकडून या गोष्टी शिकू शकतो, तेही कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय कसं ते पाहा…

लोक कुत्र्यांची काळजी आपल्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा जास्त घेतात.  पण तुम्हाला माहितीये का, की तुम्ही पाळलेले कुत्रा तुमच्याकडून काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो.

पाळीव कुत्रा तुमच्याकडून या गोष्टी शिकू शकतो, तेही कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय कसं ते पाहा...
Dog death caseImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:32 PM

बहुतेक लोकं डॉग लव्हर्स असतात. त्यामुळे लोकांना घरात पाळीव कुत्री पाळण्याची खूप आवड असते. तसंच अलीकडच्या काळात कुत्रे पाळण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. लोकं कुत्र्यांची काळजी आपल्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा जास्त घेतात.  पण तुम्हाला माहितीये का, की तुम्ही पाळलेले कुत्रा तुमच्याकडून काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. यासाठी त्याला कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज लागत नाही. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नक्की आहेत तरी काय.

1. मूलभूत आदेश तुमचे पाळीव कुत्रे तुमच्याकडून मूलभूत आज्ञा शकतात. जसे की उठणे, बसणे आणि त्याला हाक मारल्यानंतर लगेच येणे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला हाक मारता किंवा काहितरी आज्ञा देता तेव्हा तुमचा कुत्रा सुद्धा त्यांना पाहून या गोष्टी शिकतो.

2. सामाजिक कौशल्ये तुमच्याकडून तुमचा पाळीव कुत्रा सामाजिक कौशल्ये शिकत असतो. तुम्ही दररोज तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी कसे वागता हे त्याला समजत असतं. तसंच त्याला दुसर्‍या लोकांशी आणि बाहेरच्या कुत्र्यांसोबत कसं वागायचं हे समजतं.

3. तुमची पर्सनॅलिटी कुत्र्यांबाबत विशेष सांगायचं झालं तर, ते आपल्या मालकाची पर्सनॅलिटी फार लवकर अंगीकारतात. जर तुम्ही रागीट असाल तर तुमच्या कुत्र्याचे व्यक्तिमत्त्वही तसेच होऊ शकते. तसंच आळशी मालकाचा कुत्रा हा थोडा कमी चपळ असू शकतो.

4.भावना तुमचा पाळीव कुत्रा तुमचा मूड आणि भावना देखील लगेच समजू शकतो. तुमचा स्वभाव जसा असेल, तसंच तुमचा कुत्राही वागेल. त्यामुळे त्याच्यासमोर तुमचा मूड कसा ठेवायचा हे तुमच्याच हातात आहे.

5. शाब्दिक संवाद कुत्र्यांना सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जाते. कुत्रा  त्याच्या मालकासोबत राहत असताना, तो मालकाचा शाब्दिक संवाद समजून घेण्यास शिकतो. जर तुम्ही त्याला कोणत्याही ठिकाणी जायला सांगितले तर त्याला पटकन समजतं आणि तो तुमची आज्ञाही पाळतो.

6.सरळ मार्गाने चालणे तुम्ही रस्त्यावर चालत असताना तुम्ही कसे चालता याचं निरीक्षण तुमचा कुत्रा करत असतो. तसंच तुम्ही रस्त्याने जाताना अपघात टाळण्यासाठी एका बाजूने चालता, ते पाहून धोका ओळखून तुमचा कुत्राही त्याच ठिकाणी धावेल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.