AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झुंबा डान्स’चे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

अनेक जणांच्या तोंडून तुम्ही झुंबा डान्सबद्दल ऐकल असेलच. हा एक डान्सप्रकार असला तरी चांगल्यातले चांगले व्यायामाचे प्रकारदेखील याच्यासमोर फिके पडतील असे फायदे झुंबा डान्समधून शरीराला मिळतात.

झुंबा डान्स’चे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 16, 2022 | 4:03 PM
Share

‘आरोग्यम्‌ धनसंपदा’असे नेहमी म्हटले जात असते. चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप अन्‌ व्यायाम हे गमक आहे. शरीराला दीर्घ काळासाठी तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाला (exercise) महत्व असते. परंतु व्यायामापेक्षाही एक असा नृत्य वा डान्सचा प्रकार जो शरीराला चांगले फायदे देतो, हे सांगितल्यावर तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. परंतु हे खर आहे. झुंबा डान्सच्या (Zumba dance) माध्यमातून शरीराला अनेक चमत्कारी फायदे (surprising benefits) मिळत असतात. झुंबा डान्स हा इतर व्यायामांपेक्षा ते अधिक फायदेशीर आहे. यामुळे स्नायूंना बळकटी मिळत असते. पोटावरील तसेच शरीराच्या इतर भागातील चरबी कमी होते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

1. स्नायू मजबूत होतात

जेव्हा आपण झुंबा डान्स करतो तेव्हा शरीराच्या हालचाली वेगाने होतात यातून स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो आणि ते मजबूत होतात. काही आठवड्यांत, तुम्हाला झुंबा वर्कआउट्सचे फायदे पाहायला मिळतील.

2. तणाव कमी होतो

झुंबा वर्कआउटमुळे शरीरात प्रसन्न हार्मोन सेरोटोनिनची निर्मिती होउन मनातील ताण-तणाव दूर होतो. तुम्हाला प्रसन्न वाटत असते. मानसिक ताण कमी झाल्याने याचा सकारात्मक परिणाम हा आपल्या शरीरावर जाणवत असतो.

3. रक्तदाब सुधारतो

झुंबा वर्कआउट केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे प्रवाहीत होत असतात. त्यामुळे आपोओप आपल्या शरीरातील रक्तदाब कमी होत असतो. यामुळे ह्रदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होताता.

4. कॅलरीज बर्न होतात

जेव्हा आपण झुंबा डान्स करतो तेव्हा शरीराचे सर्व स्नायू ताणले जातात. त्या माध्यमातून ते अधिक सक्रिय होतात आणि हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे हा कार्डिओ वर्कआउटही मानला जातो. 40 मिनिटांचा झुंबा वर्कआउट करून सुमारे 370 कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात.

5. शरीर लवचिक होते

झुंबा डान्समुळे शरीर लवचिक होण्यास मदत मिळत असते. त्याच प्रमाणे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा चांगला होत असल्याने शारीरिक व मानसिक क्षमताही वाढण्यास मदत मिळत असते.

इतर बातम्या-

Change Environment : थंडी गायब, पारा चढला, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, कोर्टात जाण्याचा भाजपचा इशारा

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...