Change Environment : थंडी गायब, पारा चढला, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

हिवाळा आता अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. वातावरणातील बदलानुसार शेतकऱ्यांनी शेतीकामामध्येही बदल करणे गरजेचे आहे. त्याचअनुशंगाने पुढील 4 दिवस हे महत्वाचे राहणार आहेत. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी काय कामे करावेत या संदर्भात पुसा भारतीय कृषी संशोधन शास्त्रज्ञांनी नवीन सल्ला दिला आहे.

Change Environment : थंडी गायब, पारा चढला, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?
फेब्रुवारी महिन्यात पिकांची जोपासणा आणि पालभाज्याची लागवड याबाबत कृषी संशोधन संस्थेने सल्ला दिला आहे.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 3:54 PM

मुंबई : हिवाळा आता अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. (Climate change) वातावरणातील बदलानुसार शेतकऱ्यांनी शेतीकामामध्येही बदल करणे गरजेचे आहे. त्याचअनुशंगाने पुढील 4 दिवस हे महत्वाचे राहणार आहेत. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी काय कामे करावेत या संदर्भात पुसा (Indian Agricultural Research) भारतीय कृषी संशोधन शास्त्रज्ञांनी नवीन सल्ला दिला आहे. ज्यामुळे शेती पिकाचे नुकसान होणार नाही तर उत्पादनात वाढ होईल. या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार पिके आणि भाज्यांमध्ये हलके सिंचन करावे, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. शिवाय या दरम्यानच्या काळात पिकांची मशागत करुन नवीन (Vegetable Cultivation) भाजीपाला लागवड आणि वावरात उभ्या असलेल्या पिकांची कशी काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले आहे. भेंडीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ए-४, परबानी क्रांती, अर्का अनामिका आदी वाणांची निवड करावी. शिवाय लागवडीपूर्वी शेतात पुरेशी ओलाव्याची काळजी घेऊन बियाणे प्रमाण एकरी 10 ते 15 किलो याप्रमाणे घेऊन उत्पादनात वाढ करता येणार आहे. गव्हावर तांबोऱ्याचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. त्यामुळे डिथान एम-45 हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फावरणी करावे लागणार आहे.

भाजीपाला पिकांवर फवारणी

सध्याचे कोरडे व वाढते तापमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सर्व भाजीपाला व मोहरीच्या पिकांमध्ये चेपाच्या आक्रमणावर लक्ष ठेवावे लागणार आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी ते भाज्या तोडणीच्या दरम्यान भाज्यांमध्ये इमिडाक्लोप्रिड o.25 ते 0.5 मिली/लिटर पाण्याची फवारणी करतात. फवारणीनंतर आठवडाभर भाजीपाला तोडणी करु नये. जमिनीत डुबलेल्या भाजीवर चेपाने केलेल्या हल्ल्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

सध्याच्या तापमानात भाज्यांची करा लागवड

हवामानाचा विचार करता सध्याचे तापमान उन्हाळी हंगामातील मुळा इत्यादींच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. कारण हे तापमान बियाणांच्या उगवणासाठी योग्य असते. या हंगामात मार्च महिन्यात मूग व उडीद पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित स्रोतातून प्रगत बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. मूगामध्ये -पुसा विशाल, पुसा बैसाखी, पीडीएम-11, एसएमएल-32, उडीद-पंत उडीद-19, पंत उडीद-30, पंत उडीद-35 आणि पीडीयू-1 हा वाण महत्वाचे आहेत. पेरणीपूर्वी, बियाण्यांवर पीक-विशिष्ट रायझोबियम आणि फॉस्फरस याचे द्रावण शिंपडून मिसळणे गरजेचे आहे.

कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव

हवामान लक्षात घेऊन शेतकरी या आठवड्यात टोमॅटो, मिरची, भोपळ्याची भाजी या तयार रोपांची लागवड करू शकतात. मात्र, बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर थ्रिप्सच्या चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा हा कीटक आढळून येताच अर्फेडर 0.5 मि.ली. हे प्रति 3 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे लागणार आहे. रोगाची लक्षणे आढळल्यास डायथेन-एम-45 हे ३ ग्रॅम 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. तरच पिकाचे नुकासान टळणार आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा: हंगाम सुरु होऊनही द्राक्ष निर्यातीला कशाचा अडसर? नैसर्गिक संकटानंतरही समस्या कायम

Soybean Rate: सोयाबीनचे दर स्थिर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय..!\

‘जलयुक्त’योजनेतील पाणी परळीतच ‘मुरलं’ अन् चौकशीत ते बाहेरही ‘आलं’, कृषी सहसंचालकानीच दिले वसुलीचे आदेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.