ठाणे लोकसभा : युती न झाल्यास खासदार राजन विचारेंचं काय होणार?

ठाणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा भाजपसह अनेक सहकारी पक्षांनाही फायदा झाला होता. त्यात ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचाही उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. विचारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे डॉ. […]

ठाणे लोकसभा : युती न झाल्यास खासदार राजन विचारेंचं काय होणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

ठाणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा भाजपसह अनेक सहकारी पक्षांनाही फायदा झाला होता. त्यात ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचाही उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. विचारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे डॉ. संजीव गणेश नाईक यांनी 2014 मध्ये मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, शिवसेना आणि भाजप यांची युती असल्याने तसेच, मोदी लाटेमुळे विचारे यांचा तब्बल 2 लाख 81 हजार मतांनी विजय झाला. मोदी लाटेतही संजीव नाईक यांनी आपली पारंपारिक मते टिकवून ठेवण्यात यश मिळवलं. 2019 च्या निवडणुकीत संजीव नाईक कडवे आव्हान उभे करू शकतील, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या युतीचे गणित अद्याप तरी जुळलेले नसल्याने विद्यमान खासदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीच्यावतीने सध्यातरी संजीव नाईक हेच नाव आघाडीवर आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी असल्याने त्याचे परिणाम वारंवार पक्षाला भोगावे लागले आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतेच भाजपमधून पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावखरे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका संघर्ष करणाऱ्या नेत्याला कंटाळून कदाचित नाईक कुटुंबीय वेगळी वाट चोखाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा मतदारसंघांचं समीकरण

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीचं प्राबल्य आहे. पण युती न झाल्यास मात्र मतविभाजनाचा फटका शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना बसणार आहे.

बेलापुर – मंदाताई म्हात्रे, भाजप

ऐरोली – संदीप गणेश नाईक, राष्ट्रवादी

ठाणे – संजय केळकर, भाजप

ओवला माजीवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना

कोपरी पांचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना

मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता, भाजप

प्रचाराचा मुद्दा काय असेल?

ठाणे शहरात परप्रांतियांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुविधांचाही अभाव जाणवतोय. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःचं धरण हा ठाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शासकीय रुग्णालय व्यवस्था, क्लस्टर, मेट्रो, खाडी पर्यायी मार्ग, कळवा आणि घणसोली प्रस्तावित खाडी पूल असे मुद्दे निवडणुकीत दिसतील. शिवाय मराठा आरक्षणावरुन शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील यात वाद नाही.

विद्यमान खासदारांची कामगिरी

सकारात्मक मुद्दे

सर्व सहा आमदार क्षेत्रात अनेक लोकोपयोगी कामे केली

ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्टेशनला मंजुरी, कळवा-ऐरोली नवीन रेल्वे मार्ग

तुर्भे रेल्वे स्थानक येथे पादचारी पूल

बेलापूर आयकर कॉलनी येथे नवीन पादचारी पूल

ठाणे-मुलुंड दरम्यान मनोरुग्णालय जागेवर नवीन रेल्वे स्थानक

ठाणे शहरातील प्रमुख तीन उड्डाणपूल बांधणी

ठाण्यातील खाडीतून जलवाहतूक सुरु करणे

मीरा-भाईंदर येथे पादचारी पूल उभारणे

नकारात्मक मुद्दे

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ठाणे रेल्वे स्थानकात फलाट संख्या कमी

बरेच कामे राहून गेली

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयुक्त अशी व्यवस्था आणता आली नाही.

मराठी बाणा अशी ओळख असलेल्या शिवसेनेचा खासदार असतानाही परप्रांतियांमुळे मराठी कुटुंबांना वाढत्या लोकसंख्येचा त्रास

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.