AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dindori Lok sabha result 2019 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ :  दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले. इथे यंदा 64 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2014 मध्ये या मतदारसंघात 63. 40 टक्के इतके मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 0.60 इतकी […]

Dindori Lok sabha result 2019 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ :  दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले. इथे यंदा 64 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2014 मध्ये या मतदारसंघात 63. 40 टक्के इतके मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 0.60 इतकी मतदानाची वाढ झाल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते .मात्र भाजप-सेना महायुतीकडून डॉक्टर भारती पवार, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून धनराज महाले तर माकपकडून जे पी गावित या प्रमुख उमेदवारात लढत झाल्याने या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाडॉ. भारती पवार (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीधनराज महाले (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरबापू केळू बर्डे (VBA)पराभूत

या मतदार संघात एकूण 15 लाख दोन हजार 35 मतदार आहेत. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड या मतदारसंघाचा समावेश असून येथे माकपचा 1, भाजपाचा 1, शिवसेनेचा 1 आणि राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले.  दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी हा मतदारसंघ मालेगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 2009 मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाली. आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने हा मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. 2014 मध्ये असलेल्या मोदी लाटेवर स्वार झाल्याने विजय होत हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा फडकवला होता.

दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल होत, जनता दलाचे तत्कालिन विद्यमान खासदार हरिभाऊ महाले यांचा पराभव करत मालेगाव मतदारसंघात भाजपाचा झेंडा फडकविण्यात हरिश्चंद्र चव्हाण यांना यश आले होते. तेव्हापासून एक पंचवार्षिक मालेगाव तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अस्तित्वात आल्यापासून दोन पंचवार्षिक असा तीन पंचवार्षिकपासून चव्हाण यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्यावर मतदारराजाची आणिपक्षातून असलेली नाराजी याचा फायदा घेण्यासाठी माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी वडिलांची गेलेली खासदारकी पुन्हा चव्हाणांकडून घरात आणण्यासाठी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, राष्ट्रवादीत दाखल होत उमेदवारी मिळवून मोठे आव्हान उभे केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा पराभव झाला होता. मात्र यंदा त्यांना असलेली सहानुभूती चव्हाण विरोधात असलेली नाराजी याचा फायदा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर भारती पवार यांना भाजपाची उमेदवारी देऊन धनराज महाले यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले.

2014  चा निकाल 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांना 5,42,784 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी भारती पवार यांना 2,95,165 तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना 72,599, बसपाच्या शरद माळी यांना 17,724 आणि आम आदमी पक्षाच्या ज्ञानेश्वरी माळी यांना 4,067 मतं मिळाली होती.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 0.60 टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली वाढली आहे. त्यामुळे 2014 च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत फारसा काही फरक दिसून येत नाही.

विधानसभानिहाय 2019 ची मतदानाची आकडेवारी 

  • नांदगाव 54.10
  • कलवण-सुरगाणा 67
  • चांदवड-देवळा 62.20
  • येवला- लासलगाव 58.02
  • निफाड 60.47
  • दिंडोरी पेठ 70.32

हा मतदारसंघ आदिवासी असल्याने आदिवासींचा महत्वाचा वनजमिनीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न  यासह स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक झाली.

दिंडोरी मतदार संघात झालेल्या सभा

  • पंतप्रधान 1 सभा
  • मुख्यमंत्र्यांची 1 सभा
  • शरद पवार 2 सभा
  • धनंजय मुंडे 1 सभा

आतापर्यंतचे खासदार – पूर्वीचा मालेगाव आणि आताचा दिंडोरी मतदारसंघ

  • १९५७-६२ – यादव नारायण जाधव (प्रजा सामाजिक पक्ष)
  • १९६२-६७ – एल. एल. जाधव (काँग्रेस)
  • १९६७-७१- झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
  • १९७१-७७ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
  • १९७७-८० – हरिभाऊ महाले (जनता पक्ष)
  • १९८०-८४ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
  • १९८४- ८९- सीताराम सयाजी भोये (काँग्रेस)
  • १९८९-९१ – हरिभाऊ महाले (जनता दल)
  • १९९१-९६ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
  • १९९६-९८- कचरुभाऊ राऊत (भाजप)
  • १९९८-९९ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
  • १९९९-२००४ – हरिभाऊ महाले (जनता दल)
  • २००४-२००९ – हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
  • २००९- २०१४- हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) दिंडोरी
  • २०१४-१९ – हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) दिंडोरी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या