AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Lok sabha result 2019 : सांगली लोकसभा मतदारसंघ निकाल  

सांगली लोकसभा मतदारसंघ :  भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. येथे तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजपाकडून खासदार संजय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. यंदा 2019 च्या निवडणुकीत येथे 65.38  टक्के मतदानाची नोंद झाली. […]

Sangli Lok sabha result 2019 : सांगली लोकसभा मतदारसंघ निकाल  
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM
Share

सांगली लोकसभा मतदारसंघ :  भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. येथे तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजपाकडून खासदार संजय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. यंदा 2019 च्या निवडणुकीत येथे 65.38  टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत 11 लाख 78 हजार 814 लोकांनी मतदान झाले होते. सांगली लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये एकूण 10 लाख 46 हजार 659 इतके मतदान झाले होते. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत  63.47 टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळेच्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजयकाका पाटील (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीविशाल पाटील (स्वाभिमानी)पराभूत
अपक्ष/इतरगोपीचंद पडळकर (VBA)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक महाराष्ट्रातील राजकीयदृष्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा 2014 च्या मोदी लाटेत पहिल्यांदाच उधवस्त झाला. त्यावेळी भाजपचे उमेदवार संजय पाटील तब्बल सव्वा दोन लाख मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांनी तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला.

2019 च्या सांगली लोकसभा निवडणुकीत विधानसभानिहाय  मतदानाची आकडेवारी

सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदार संघ येतात

1)   मिरज विधानसभा मतदारसंघात 2 लाख 9 हजार 18 इतके मतदान झाले. ( 64.48 टक्के )

2)  सांगली विधानसभा मतदारसंघात 2 लाख 2 हजार 158 इतके मतदान झाले. ( 63.02 टक्के )

3)  पलुस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 86 हजार 404 इतके मतदान झाले. ( 67.72 टक्के )

4)   खानापुर  विधानसभा मतदारसंघात 2 लाख 7 हजार     61 इतके मतदान झाले. ( 64. 48 टक्के)

5)  तासगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 4 हजार 57 इतके मतदान झाले. ( 69.85 टक्के )

6) जत विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 116 इतके मतदान झाले. ( 63. 10 टक्के )

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्य, कोणाकोणाच्या सभा? 2019 च्या या निवडणुकीत भाजपा उमेदवार खासदार संजय पाटील यांच्यासाठी भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची तासगाव येथे सभा झाली. तर  वीटा इथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. शिवाय सांगली आणि जतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली.

तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तासगाव येथे सभा झाली.

तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांची सांगली येथे सभा झाली. महत्त्वाचे म्हणजे सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये इतर पक्षांच्या झालेल्या सभेमध्ये  गोपिचंद पडळकर यांच्या सभेला सर्वात जास्त गर्दी होती. याठिकाणी तिरंगी लढत होत असली तरी सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा कुठे तरी बाजूला राहिला.

Follow Us
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....