AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shirur Lok sabha result 2019 : शिरुर लोकसभा मतदारसंघ निकाल

शिरुर लोकसभा मतदारसंघ : शिरुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळत आहे. या […]

Shirur Lok sabha result 2019 : शिरुर लोकसभा मतदारसंघ निकाल
शिरुर : अमोल कोल्हे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

शिरुर लोकसभा मतदारसंघ : शिरुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांनी बाजी मारली. शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात शिवसेने-भाजप युतीकडून शिवाजी आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाआघाडीकडून नव्याने राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले अभिनेता डॉ.अमोल कोल्हे आणि बहुजन वंचित आघाडीकडून राहुल ओव्हळ यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाशिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीअमोल कोल्हे (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरपराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक महाराष्ट्रातील राजकीयदृष्या रंगतदार लढत म्हणून शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जाते. एकीकडे सलग तीन वेळा शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतून नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले स्वराज्य रक्षक संभाजी या टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले डॉ.अमोल कोल्हे आहेत. या दोघांमध्ये थेट लढत होत आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून घरघरात पोहोचलेले डॉ अमोल कोल्हे यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील प्रमुख लढत म्हणून शिरुरच्या लढतीकडे पाहिले जात आहे.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत शिरुर लोकसभा मतदारसंघात एक टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.

2014 विधानसभानिहाय मतदान आकडेवारी

  • जुन्नर-1,80,990
  • आंबेगाव-1,86,130
  • खेड-आळंदी 1,75,022
  • शिरुर-1,79,566
  • भोसरी-1,77,113
  • हडपसर-1,89,829

2019 विधानसभानिहाय मतदान आकडेवारी

  • जुन्नर-1,93,965
  • आंबेगाव-1,97,052
  • खेड-आळंदी-2,02,740
  • शिरुर-2,27,542
  • भोसरी-2,37,767
  • हडपसर-2,33,316

विधानसभा मतदारसंघ 2019 मधील मतदान%

  • शिरुर -52%
  • आंबेगाव-47%
  • जुन्नर-90%
  • खेड-आळंदी -76%
  • भोसरी-70%
  • हडपसर-84%
  • एकूण मतदार संख्या -21,73,,448

2019 मधील शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 20 हजार 988 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात एक ते दीड टक्यांनी घट झाली आहे. भोसरी विधानसभा आणि हसपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं.

गेल्या पंधरा वर्षांपासून तीच आश्वासने पूर्ण न झाल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदारांची नाराजी पाहिला मिळली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि जातीचे राजकारण, तर गेल्या पंधरा वर्षांपासूनचा खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघाची इतंभूत माहिती, राजकारणाचा दीर्घ अनुभव आणि गेल्या 20 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

कोणाकोणाच्या सभा?

शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने यावेळी शिवसेना भाजप महायुतीकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राज्यमंत्री विजय शिवतारे,शिवसेना चित्रपट सेना उपाध्यक्ष सुबोध भावे तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडून माजी कृषीमंत्री शरद पवार,माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,छगन भुजबळ,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील आदींच्या सभा शिरुर लोकसभा मतदारसंघात झाल्या.

प्रचाराचे मुद्दे

शिरुर लोकसभा क्षेत्रामधील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर या महामार्गावरील वाहतूक कोंडी, विमानतळ प्राधिकरण यांच्या आहावालाने खेड तालुक्यातील बहुचर्चित असे खेडचे विमानतळ गेल्याने, हा सुद्धा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बैलगडा शर्यत बंदी या आणि अशा अनेक मुद्द्यांनी यंदा प्रजार गाजला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्याची आस्था असलेला बैलगाडा बंदी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. तो मुद्दा मीच सोडवणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...