AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी महामंडळात एकाच वेळी ११ अधिकारी निलंबित,कामचुकार अधिकाऱ्यात हडकंप…

एसटी महामंडळाच्या ११ अधिकाऱ्यांवर एकाच वेळी झालेल्या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतेच उत्पन्न न वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

एसटी महामंडळात एकाच वेळी ११ अधिकारी निलंबित,कामचुकार अधिकाऱ्यात हडकंप...
pratap sarnaik
| Updated on: Jul 02, 2026 | 5:57 PM
Share

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या ११ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आल्याने महामंडळात खळबळ उडाली आहे. कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याने कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एसटी महामंडळाचे भाडेवाढ झाल्यानंतरही उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे कामात हलगर्जी करणाऱ्यांची काही खैर नाही असे म्हटले जात होते. आता अधिकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई झाल्यानंतर आता कोणाची बारी येणार या धास्तीने कर्मचारी कामाला लागले आहे.

कारवाई झालेल्या ११ अधिकाऱ्यात क्लास वनचे तिघा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने बड्या अधिकाऱ्यांपासून ते साध्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये भीती पसरली आहे. एसटी महामंडळाच्या प्रवासी भाड्यात वाढ होऊनही गेले दोन सिझन प्रवासी उत्पन्न कमी होत चालले आहे. नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाई करण्याचे आदे दिले आहे. मात्र, आता दुसऱ्याच दिवशी एकाच वेळी 11 अधिकारी निलंबित झाल्याने खळबळ उडाली आहे.या कारवाईच्या बडग्यात क्लास वनचे 3 अधिकारी आणि क्लास टूचेआठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळातील या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या कामात हलगर्जीपणा आढळल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात कारवाईत दोन डेपो मॅनेजरसह नऊ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.दहा जून रोजी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांच्या समितीकडून इन्स्पेक्शन करण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञानचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी या दोन सदस्यांच्या समितीने केले होते.

पोस्टाद्वारे नोटीस पाठवण्यात येणार

इन्स्पेक्शन दरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळल्याने नाशिक विभागातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील विविध विभागात कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून आलेली निलंबनाची ऑर्डर न स्वीकारल्यास त्यांना पोस्टाद्वारे नोटीस पाठवण्यात करण्यात येणार आहे. कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील कामकाजही देखील ठप्प झाल्याची चर्चा आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर