११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ब्रेक, पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी – पालकांना मन:स्ताप
21 मे 2025 पासून महाराष्ट्र FYJC प्रवेश 2025 साठी सुरुवात झाली होती.11वी मध्ये एडिशनसाठी रजिस्ट्रेशन करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागा ऑफिशिल वेबसाइटवर जाताच विद्यार्थ्यांना साईट अंडर कंन्ट्रक्शन असा संदेश येत आहे.

Maharashtra Class 11th Admission: दहावीचा निकाल लागल्यानंतर आज २१ मे २०२५ पासून ११ वीची ( FYJC – First Year Junior College )ऑनलाईन प्रवेश परिक्षा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्रशासनाची वेबसाईट बंद पडली आहे. आज बुधवार ( २१ मे २०२५ ) अकरावीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु होणार होते. परंतू सरकारची बेवसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचा संदेश या वेबसाईटवर येत आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे.
११ वीच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरु होणार होती. आता रजिस्ट्रेशनसाठी प्रक्रिया सुरू होणार होती.मात्र महाराष्ट्र शासनाची अकरावी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट हँग झाली आहे. ही लिंक लिंक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता बंद होईल असे या बेवसाईटवर म्हटले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ एक आठवड्याचा वेळ आहे. अशात पहिल्याच दिवशी सरकारी वेबसाईट ठप्प झाली आहे. विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ दिलेला आहे.




आठवडाभरात अर्ज भरण्याचा प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतू पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग झाल्याने राज्य शासनाचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थी किमान एक आणि जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांसाठी त्यांची पसंती देऊ शकतात. दहावी बोर्डानुसार यंदा महाराष्ट्र एफवायजेसी प्रवेशसाठी एकूण ९,२८१ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील २० लाखांहून अधिक जागांसाठी अर्ज येणार आहेत.
९४.१० टक्के निकाल लागला
महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल ९४.१० टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यापैकी १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा दहावीला मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक ,कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, लातूर या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे.
दहावीच्या परीक्षेला राज्यातल्या ९ विभाग मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या सर्वांची उत्तीर्ण टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.