AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पुणे आता जळगाव… निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सापडली रोकड, आकडा ऐकून…

पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातून एका गाडीतून 5 कोटींची रक्कम सापडल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच आता जळगावजवळही असाच प्रकार घडला आहे.  जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर लाखोंची रक्कम सापडली आहे.

आधी पुणे आता जळगाव... निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सापडली रोकड, आकडा ऐकून...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 24, 2024 | 8:03 AM
Share

पुण्यातील खेड-शिवापूर परिसरातून एका गाडीतून 5 कोटींची रक्कम सापडल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच आता जळगावजवळही असाच प्रकार घडला आहे.  जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर लाखोंची रक्कम सापडली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान तेथ 16 लाख 38 हजार रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून सर्वत्र तपासणी सुरू आहे. याच दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडू तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी चोपडाई तपासणी नाक्यावर ही लाखो रुपयांची रक्कम सापडली. त्यावेळी पथकाने कारवाई केली. लाखो रुपयांची ही रक्कम पथकाने उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली.

सापडलेले पैसे हे 10 लाख रुपयांच्या वर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान हे पैसे ज्या वाहनात सापडले ते एका व्यापाऱ्याची कापसाची रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पुण्यात सापडले होते 5 कोटींचे घबाड

काही दिवसांपूर्वीच पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्याच दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली. यावरून राजकारण तापलं होतं. ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे प्रकरण अजून तापलेले असतानाच आता जळगावमध्येही लाखो रुपये सापडले आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?