चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील वरणात पाल पडल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा
डॉक्टरांनी उपचारानंतर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. शाळेच्या या निष्काळजी कारभाराविषयी आता समाज कल्याण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या नगराळा गावातील अमृत नाईक खाजगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वरणाच्या भांड्यात पाल पडल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. आज सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवण दिले होते. मुलींच्या जेवणानंतर मुले जेवत होती. मात्र वरणाच्या भांड्यात पाल पडल्याचे बघितल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मुलींनी जेवण करत असलेल्या मुलांना याविषयी सांगितल्यानंतर सर्वांनाच मळमळ- उलटीचा त्रास होऊ लागला. यापैकी 31 विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
