AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी ऋतुजा पाटील ताब्यात

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांनी नंदुरबारमधून ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने झाडाझडतीनंतर ज्ञानदीप सोसायटीतील तिच्या घरातून ही कारवाई केली. या अटकेमुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी ऋतुजा पाटील ताब्यात
| Updated on: Sep 01, 2026 | 7:43 PM
Share

MPSC च्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला नंदुरबारमधून ताब्यात घेण्यात आलं. ऋतुजा हिला ताब्यात घेतल्यानंतर पेपरफुटी प्रकरणातील तपासाला वेग येणार आहे. ऋतुजा पाटील हिला नंदुरबारातील ज्ञानदीप सोसायटीमधील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे विशेष गुन्हे शाखेचे पथक आज सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झालं होतं. पोलिसांच्या पथकाने नंदुरबारातील विविध ठिकाणी झाडाझडती घेत चौकशी केली. त्यानंतर अखेर ऋतुजा पाटील हिला तिच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं.

ताब्यात घेतल्यानंतर ऋतुजा पाटील हिला मुंबईतील विशेष गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. पेपर खरेदी केल्याचा आणि नंतर तो प्रियकराला दिल्याचा आरोप ऋतुजा पाटील हिच्यावर आहे. आता ऋतुजाच्या ताब्यामुळे औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं ?

MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील ही अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या राहत्या घरातून मुंबई पोलिसांनी तिला अटक केली. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या बिनसलेल्या प्रेमप्रकणामुळेच हा पेपरफुटीचा प्रकार उघड झाला. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती. ऋतुजाच्या हातात तो पेपर आल्यावर तिने प्रेमापोटी तो पेपर गौरव पाटील यालाही दिला. मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्यावर गौरव पाटील यानेच MPSCकडे तक्रार दाखल केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अनेकांना अटक

या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांचाही समावेश आहे. तसेच सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात परीक्षार्थी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. तर आता ऋतुजा हिलाबी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,