AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे PA होणार मालामाल! स्वीय सहायकांना 5 हजाराची पगार वाढ

मुंबई : सत्तेत आल्यापासून शिंदे फडणवीस सरकारने अनेक घोषणांचा सपाटा लावला आहे. पावसाळी अधिवेशनात देखील अनेक घोषणांचा पाऊस पडला आहे. अशीच एक घोषणा विधानसभेत झाली आहे. या घोषणेमुळे मंत्र्यांसह आमदारांचे पीए मालामाल होणार आहेत. मंत्री आणि आमदारांचे पीए म्हणजेच स्वीय सहाय्यकांची वेतन वाढ(salary hike ) करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार स्वीय […]

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे PA होणार मालामाल! स्वीय सहायकांना 5 हजाराची पगार वाढ
विधान भवन...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 25, 2022 | 11:22 PM
Share

मुंबई : सत्तेत आल्यापासून शिंदे फडणवीस सरकारने अनेक घोषणांचा सपाटा लावला आहे. पावसाळी अधिवेशनात देखील अनेक घोषणांचा पाऊस पडला आहे. अशीच एक घोषणा विधानसभेत झाली आहे. या घोषणेमुळे मंत्र्यांसह आमदारांचे पीए मालामाल होणार आहेत. मंत्री आणि आमदारांचे पीए म्हणजेच स्वीय सहाय्यकांची वेतन वाढ(salary hike ) करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार स्वीय सहायकांच्या वेतनामध्ये पाच हजाराची वाढ करण्यात आली आहे, पावसाळी अधिवेशानाच्या शेवटच्या दिवशी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानपरिषदेचे सभापती व उप सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्रत्येक मंत्री व राज्यमंत्री, विधानमंडळाचे सदस्य याणि विधिमंडळातील विरोधी नेते यांच्या स्वीय सहायकाच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. यांच्या वेतनात दरमहा 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्वीय सहायकांचे वेतन 30 हजार रुपये करण्यात आले आहे. याबाबतचे विधेयक आज विधिमंडळात मंजूर करण्यात आले. या वेतन वाढीवर सरकारच्या तिजोरीतून दरवर्षी अतिरिक्त 2 कोटी 19 लाख 60 हजार रुपये खर्च होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिववर नामांतराचा ठराव मंजूर

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या ठराव देखील पावसाळी अधिवेशनात मंजूर झाला. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर हा ठराव मंजूर झाला आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यालाही मंजुरी

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यालाही मंजुरी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मनाबादच्या नामकरणाचा निर्णय घेतला. पण, नंतर शिंदे सरकारने हा ठराव बेकायदेशीररीत्या मांडल्याचा ठपका ठेवून निर्णयाला स्थगिती दिली. पण, आता नव्याने या प्रस्तांना मंजुरी देण्यात आली आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.