AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढा मोठा बंगला पाडायचा कशाला.. 1350 स्क्वेअर फुटाचा बंगला उचलून दुसरीकडे ठेवणार, नाशिकची घटना

येवल्यातील बंगल्याचे अनोखे स्थलांतर सुरू आहे. बंगला पाडण्याऐवजी चक्क बंगला उचलला जातोय. उद्योजक व बंगला मालक सम्राट वर्मा यांनी अनोखा निर्णय घेतला. 1350 स्क्वेअर फुटांचा बंगला 120 फूट स्थलांतरित होत आहे.

एवढा मोठा बंगला पाडायचा कशाला.. 1350 स्क्वेअर फुटाचा बंगला उचलून दुसरीकडे ठेवणार, नाशिकची घटना
Yeola Bungalow
| Updated on: Sep 09, 2026 | 12:03 PM
Share

उमेश पारीक ,टीव्ही9 मराठी लासलगाव :  येवला तालुक्यात बंगल्याचे अनोखे स्थलांतर सुरू आहे. बंगला पाडण्याऐवजी चक्क बंगला उचलला येतोय. उद्योजक व बंगला मालक सम्राट वर्मा यांनी अनोखा निर्णय घेतला. 1350 स्क्वेअर फुटांचा बंगला 120 फूट स्थलांतरित होत आहे. तब्बल 250 जॅकच्या मदतीने बंगला उचलण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असल्याने बंगल्याचे स्थलांतर केले जात आहे. बंगला पाडण्यापेक्षा मध्यला मार्ग बंगला मालकाने काढला. हरियाणातील कुरुक्षेत्र येथून विशेष कारागिरांची टीम दाखल झाली. 10 मजुरांच्या मदतीने जॅक लावून जागेवरून हा बंगला उचलला जाणार आहे. याची तूफान चर्चा ही रंगताना दिसतंय. बंगला स्थलांतराच्या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात संपूर्ण बंगला स्थलांतराचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.

येवला तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांनी बंगला पाडण्याऐवजी चक्क बंगलाच स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल अडीचशे जॅकच्या मदतीने हा 1350 स्क्वेअर फुट बांधकाम असलेला बंगला उचलण्याचं काम सुरू आहे. फॅक्टरीजवळ नव्याने बांधलेलं बंगला रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होतो. मात्र, बंगला पाडून नुकसान करण्याऐवजी ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कारागिरांना बोलावण्यात आलंय… सुमारे अडीचशे जॅक आणि दहा मजुरांच्या मदतीने बंगला जागेवरून 120 फूट उचलून स्थलांतरित करण्यात येत आहे… या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे… विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात संपूर्ण बंगला स्थलांतर करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे

या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. हा प्रयोग यशस्वी होतो का? याबाबत लोकांच्या मनात मोठी उत्सुकता बघायला मिळतंय. बंगला रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असल्याने स्थलांतरीत केले जात आहे. यासाठी खास हरियाणातून कामगारही आली आहेत. या बंगल्याचे स्थलांतर नक्की कसे होते, हे पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतंय.

Follow Us
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?