Solapur Accident : सोलापूरमध्ये पोकलेनचे बकेट डोक्यावर पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, नवीन विहिरीची पूजा करताना घडला अपघात

श्रीकृष्ण गुंड यांच्या शेतात विहिरीचे काम करायचे होते. त्यासाठी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पोकलेन मशिनच्या मदतीने विहिर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत होते. याच दरम्यान पोकलेन मशिनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्याच्या वरतीच होते. पूजा सुरु असताना अचानक हे बकेट गुंड यांच्या डोक्यावर पडले.

Solapur Accident : सोलापूरमध्ये पोकलेनचे बकेट डोक्यावर पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, नवीन विहिरीची पूजा करताना घडला अपघात
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
सागर सुरवसे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 28, 2022 | 11:02 PM

सोलापूर : विहीर खोदण्याकरता जागेची पूजा करताना पोकलेनचे बकेट (Poklen Bucket) अंगावर पडून विहीर मालक जागीच ठार (Death) झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील देवळाली येथे घडली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास पूजा (Pooja) सुरु असताना ही घटना घडली. श्रीकृष्ण गुंड असे या अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा संदीप श्रीकृष्ण गुंड यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी पोकलेन ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी करमाळा पुढील कारवाई करत आहेत.

पोकलेन ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल

श्रीकृष्ण गुंड यांच्या शेतात विहिरीचे काम करायचे होते. त्यासाठी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पोकलेन मशिनच्या मदतीने विहिर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत होते. याच दरम्यान पोकलेन मशिनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्याच्या वरतीच होते. पूजा सुरु असताना अचानक हे बकेट गुंड यांच्या डोक्यावर पडले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बकेट अंगावर पडून दुखापत होईल याची जाणीव असतानाही ऑपरेटरने डोक्यावरून बकेट आजूबाजूला केले नाही. ते बकेट वडिलांच्या अंगावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माहूरकर हे करत आहेत. (A farmer died on the spot when a bucket of Poklen fell on his head in Solapur)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें