आदिवासी विकास विभागाचा ‘आदिहाट’ उपक्रम आहे तरी काय? लाखों रुपये खर्च करून सुरू केलेले ‘आदिहाट’ उपक्रमाची जोरदार चर्चा

आदिवासी संस्कृतीशी निगडीत असलेल्या वस्तु, धान्य आणि खाद्यपदार्थ एकाच छताखाली आदिहाट उपक्रमाच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागाचा 'आदिहाट' उपक्रम आहे तरी काय? लाखों रुपये खर्च करून सुरू केलेले 'आदिहाट' उपक्रमाची जोरदार चर्चा
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 8:05 AM

नाशिक : आदिवासी विकास महामंडळाच्या पुढाकाराने पाहिल्यांचा अभिनव प्रयोग राबविण्यात आला आहे. त्याची चर्चा संपूर्ण आदिवासी भागात होऊ लागली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आदिहाट हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहरातील तीन विभागात याबाबतचे उद्घाटनही पार पडले आहे. आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आदिहाट उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांची कला कायमस्वरूपी जतन व्हावी आणि संवर्धन व्हावे यासाठी आदिहाट उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुणडे आणि आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. नाशिकच्या ठक्कर बाजार, महामार्ग बसस्थानक आणि नाशिकरोड रेल्वेस्थानक अशा तीन ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे आदिवासी संस्कृती आणि कला यानिमित्ताने समोर येणार आहे.

नाशिक विभागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहे. वर्षानुवर्षे ते आपल्या संस्कृतीचा वारसा आणि कलेचा वारसा पुढे सुरू ठेवत असतात.

मात्र, भन्नाट कला ही मर्यादितच राहते, आदिवासी बांधवांची संस्कृतीही काही विशिष्ट लोकांनाच माहिती आहे हीच बाब जगाला कळावी यासाठी आदिवासी विभागाने मोठं पाऊल टाकलं आहे.

हे सुद्धा वाचा

आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काही वस्तु बनवून घ्यायच्या, याशिवाय आदिवासी भागात असलेली औषध देखील या आदिहाटमध्ये विक्रीसाठी आहे.

आदिवासी बांधवांची खाद्य संस्कृती देखील या आदिहाटमध्ये असणार आहे. कमी दरात धान्य मिळणार असल्याने चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

आदिवासी बांधवांच्या हातातल्या कलाकुसरीला आदिहाट मधून शहरांच्या ठिकाणी असणारा जाणकार ग्राहक वर्ग मिळणार असून त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी मदत होणार असल्याचे उद्घाटनावेळी आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी विश्वास व्यक्त केला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.