AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समोरच बसले, एकटक पाहिलं… सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर, बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबईतील रस्ते कामांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आले. या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

समोरच बसले, एकटक पाहिलं... सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर, बैठकीत नेमकं काय घडलं?
eknath shinde aaditya thackeray
| Updated on: Mar 24, 2025 | 6:15 PM
Share

मुंबईत रस्ते कामाच्या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे उपस्थित आहे. या बैठकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले आहेत. या बैठकीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमनेसामने आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईतील रस्ते कामाच्या बैठकीसाठी येताच सर्व आमदारांनी त्यांचे उभं राहून स्वागत केले. मात्र आदित्य हे खुर्चीवरच बसून राहिले. यानंतर आदित्य ठाकरे हे त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसून एकनाथ शिंदेंना एकटक पाहत होते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही त्यांच्याकडे पाहिले नाही.  ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

बैठकीत काय घडलं? 

मुंबईतील रस्त्यांच्या क्राॉक्रीटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे ही मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी रस्ते कामांच्या आढावा घेणारा रिपोर्ट सादर केला. यात त्यांनी टप्पा १ मध्ये २३ टक्के काम झाले. तर टप्पा २ मध्ये ०.५ टक्के काम झाल्याची माहिती दिली. रस्त्यांच्या कामांचा दर्जा; मुदतीत काम पूर्ण होणार का? समन्वयातील अडथळे यावर आमदारांनी लक्ष वेधले. आशिष शेलार यांनीही आपल्या मतदारसंघातील रस्ते कामाबाबत असणाऱ्या समस्या मांडल्या.

येत्या ३१ मे पर्यंत मुंबईतील सुरु असलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. १५ मीटरपेक्षा कमी असणारे, लहान रस्ते सिमेंट क्राँक्रीटीकरण न करता अस्फॉल्ट मध्ये त्यांची कामे करावीत, अशी सूचनाही आमदारांनी केली.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा