AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभय भुतडा फाउंडेशनकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडास 5 कोटी

Abhay Bhutada Foundation: एकतेचा आणि करुणेचा सामर्थ्यशाली संदेश देत, अभय भुतडा फाउंडेशनने महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी 8 कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले आहे. यापैकी 5 कोटींची रक्कम महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अभय भुतडा फाउंडेशनकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडास 5 कोटी
Abhay Bhutada Foundation
| Updated on: Oct 15, 2025 | 7:31 PM
Share

मुंबई, 15 ऑक्टोबर: एकतेचा आणि करुणेचा सामर्थ्यशाली संदेश देत, अभय भुतडा फाउंडेशनने महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी 8 कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले आहे. यापैकी 5 कोटींची रक्कम महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली असून, राज्यभरातील भीषण पुरानंतर तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कामांसाठी ही मदत उपयोगात आणली जाणार आहे.

उद्योजक, परोपकारी आणि अभय भुतडा फाउंडेशनचे अध्यक्ष सीए अभय भुतडा यांनी स्वतः मुंबईत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन उपक्रमांना गती देण्यासाठी या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेल्या मदतीव्यतिरिक्त, या फाउंडेशनतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत असलेल्या स्थानिक संस्थांना 3 कोटी रूपयांचे योगदान दिले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे घर, उपजीविका आणि आशेचा पुनर्निर्माण करण्यासाठी मदत करणे, हे या मदतीचे उद्दिष्ट आहे.

“समाजिक योगदान ही केवळ जबाबदारी नाही, तर ही एक अंतःप्रेरणा आहे.”, असे सीए अभय भुतडा म्हणाले. “पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या लातूरसारख्या जिल्ह्यात जन्म झाल्याने ही आपत्ती म्हणजे माझ्यावरच आपत्ती आल्यासारखी वाटते. आपले शेतकरी आणि समाज सक्षम आहेत, पण त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पाठींबा देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने सोबत यावे आणि मनापासून मदत करावी, अशी मी विनंती करतो.”

आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक जतन आणि आपत्ती निवारण या क्षेत्रांतील परिणामकारक उपक्रमांद्वारे जीवनमान उंचावण्यास अभय भुतडा फाउंडेशन कटिबद्ध आहे. सर्वसमावेशक विकास आणि दीर्घकालीन परिवर्तनावर लक्ष केंद्रीत ठेवत, फाउंडेशनने देशभरातील 5 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे.

हे नवीनतम योगदान संकटाच्या काळात समाजासोबत उभे राहण्यासाठी आणि त्यांना अधिक आशादायक उद्यासाठी सक्षम करण्यासाठी फाउंडेशनच्या अटळ वचनबद्धतेला अधोरेखित करते.

अभय भुतडा फाउंडेशनबद्दल माहिती

2023 मध्ये स्थापन झालेली अभय भुतडा फाउंडेशन समाजातील वंचित घटकांच्या उन्नती, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. अल्पकालीन मदतीपेक्षा दीर्घकालीन परिणामावर भर देत, फाउंडेशनतर्फे शाश्वतता आणि मोजता येणारे परिणाम लक्षात घेऊन प्रत्येक उपक्रमाची रचना करण्यात येते. सीए अभय भुतडा यांच्या वैयक्तिक निधीतून चालविण्यात येणारी ही फाउंडेशन शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक जतनाशी संबंधित विविध उपक्रमांना सहाय्य करते. फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अल्पावधीतच लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला असून, केवळ मदतच नव्हे तर प्रेरणा, आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा ठोस मार्ग अनेकांना फाउंडेशनने दाखवला आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.